Gold Rate | रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याचे दर वर्षभरात वाढणार की घटणार?

सोनं-चांदीला वर्षाचा 365 दिवस मागणी असतेच, लग्नासाठी अलंकार बनवण्यासाठी किंवा गुतंवणूकीसाठी अनेक जण सोन्याकडे पाहतात.   

Updated: Feb 25, 2022, 10:47 PM IST
Gold Rate | रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याचे दर वर्षभरात वाढणार की घटणार? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : सोनं-चांदीला वर्षाचा 365 दिवस मागणी असतेच, लग्नासाठी अलंकार बनवण्यासाठी किंवा गुतंवणूकीसाठी अनेक जण सोन्याकडे पाहतात. सोन्याचे दर कितीही वाढोत, ग्राहक सोने आपआपल्या कुवतीनुसार खरेदी करतातच. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे सोन्यावर काय परिणाम होईल, या युद्धामुळे सोन्याचे दर कमी होतील की वाढतील हे आपण या निमित्ताने जाणून घेऊयात.  (gold rate is might higher in coming year due to russia ukraine crisis) 

रशिया युक्रेन युद्धामुळे पुढचं वर्षभर सोन्याचे दर चढेच राहणार आहेत. युद्ध संपलं, तरी सोन्यात तेजी कायम राहील असा अंदाज सोन्या चांदीच्या व्यापारातील तज्ज्ञांनी वर्तवलाय. काल युद्ध सुरु होताच सोन्याचे दर 52 हजार 500 रुपयांवर वर पोहचले होते. आणखी काही दिवस युद्ध चाललं तर हे भाव 55 हजार रुपयांच्या वर जाऊन पोहोचतील. पुढच्या आर्थिक वर्षात सोनं 57 हजारांवर जाण्याची शक्यता, वर्तवण्यात आली आहे.