Gold Price Today On 29th May: सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. या आठवड्यात सोमवारपासून सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. चांदीचे दर देखील आज वाढले आहेत. जागतिक बाजारातील पॉझिटिव्ह संकेतांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गंत सराफा बाजारात चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. भारतीय वायदे बाजारात आज सोनं हिरव्या रंगात ट्रेड करत आहे. कर, चांदीच्या दरातही 400 रुपयांची वाढ झाली आहे. MCX वर बुधवारी चांदीचा भाव महागला आहे, चांदीचा वायदा 95,700 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
देशांतर्गत बाजारात दोन्ही मौल्यवान धातूच्या फ्युचर्स किंमतीत पुन्हा एकदा वाढ नोंदवली गेली आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. मात्र, सोमवारपासून पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या फ्युचर्स किंमतीत वाढ नोंदवली गेली आहे. MCX वर सोन्याचा जून वायदा अवघ्या 25 रुपयांनी घसरुन 72,155 रुपयांवर उघडला होता. तर, तज्ज्ञांच्या मते चांदीच्या किंमती वाढून 31 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहेत.
गुडरिटर्न्सनुसार, आज बुधवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 73,200 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 67,100 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट 67, 100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 73, 200 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54, 900 रुपये
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,710 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,320 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5,490 रुपये
8 ग्रॅम 22 कॅरेट 53,680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 58,560 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43,920 रुपये
22 कॅरेट- 67, 100 रुपये
24 कॅरेट- 73, 200 रुपये
18 कॅरेट- 54, 900 रुपये