ग्राहकांना पुन्हा दिलासा! सोन्याच्या दरात पुन्ही मोठी घट, वाचा आजचा भाव

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घट झाली आहे. सोन्याच्या दरात घट होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 27, 2024, 11:42 AM IST
 ग्राहकांना पुन्हा दिलासा! सोन्याच्या दरात पुन्ही मोठी घट, वाचा आजचा भाव title=
gold price today on 27th July 22kt 24kt gold rates check price

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरले आहेत. अर्थसंकल्पात सोनं-चांदीच्या कस्टम ड्युटीत घट केल्यानंतर मोल्यवान धातुच्या किंमतीत घट झाली आहे. या आठवड्यात MCXवर सोनं 4804 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याची किंमत 68186 रुपये प्रति तोळा अशी आहे. तर, चांदीच्या किंमतीत 8275 रुपयांची घट होऊन चांदी प्रतिकिलो 81371 रुपयांवर स्थिर झाली आहे. कस्टम ड्युटीत घट झाल्यानंतर सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. 

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 68,870 रुपये आहेत. तर, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 68,720 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. तर, चांदीचा भाव 84,400 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 63, 250 इतकी आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 51,750 रुपये इतकी आहे. 

गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच 19 जुलै रोजी सराफा बाजारात सोने 73273 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदी 89300 रुपये प्रति किलोवर बंद झाली. अशा स्थितीत या आठवड्यात सराफा बाजारात सोने 2573 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदी 4900 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

2024 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणले आहे. सीमाशुल्कात कपात केल्याने सोने आयात स्वस्त झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळं सोन्याच्या तस्करीला आळा बसेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सोन्याच्या किमतीवरील मूलभूत सीमाशुल्कात कपात केल्यामुळे मौल्यवान धातू स्वस्त झाला आहे. अचानक झालेल्या बदलामुळे बाजारातील गोंधळाची स्थिती आहे. तरी किरकोळ गुंतवणूकदारांना सोन्याच्या नवीन आणि अधिक आकर्षक किमतींचा फायदा होईल.