अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर वाढले की कमी झाले? वाचा सोन्याचा आजचा भाव

Gold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 24, 2024, 11:33 AM IST
 अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर वाढले की कमी झाले? वाचा सोन्याचा आजचा भाव title=
Gold Price Today on 24rd July 2024 gold rates fall silver slips before budget 2024

Gold Price Today In Marathi: मंगळवारी केंद्र सरकारने सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर सोन्याचे भाव गडगडले होते. मंगळवारी सोनं तब्बल पाच हजारांनी घसरले होते. तर चांदीच्या दरातही 4 हजारांची घट झाली होती. सीमा शुल्क कमी केल्यानंतर वायदे बाजारात सोनं 4,200 रुपयांनी कमी होऊन 68,500 रुपयांवर स्थिर झाले होते. तर, चांदी 85,000वर स्थिरावली होती. मात्र आज बुधवारी सोन्याच्या दरात तेजी दिसत आहे. भारतीय वायदे बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

सकाळी सोनं एमसीएक्सवर 320 रुपयांनी (0.47%) वधारले होते. त्यामुळं प्रतितोळा 68,830 रुपये आज सोन्याची किंमत आहे. मंगळवारी सोनं 68,510 रुपयांवर स्थिर झाले होते. यादरम्यान 194 रुपयांनी चांदी वधारली असून 85,113 रुपयांवर स्थिरावली आहे. काल चांदीचा भाव 84,919 रुपयांवर बंद झाला होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं पुन्हा एकदा चकाकलं आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेकडून यावर्षी व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुंतवणुकदारांचे आकड्यांकडे लक्ष आहे. यादरम्यान स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून 2,102$ डॉलर प्रति औंसवर होते. 

सरकारकडून सोनं आणि चांदीच्या सीमा शुल्कात घट करुन 6 टक्क्यांपर्यंत केले आहेत. सरकारच्या या घोषणेनंतर वायदे बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 3,350 रुपयांनी घसरून 72,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ऑल इंडिया बुलियन असोसिएशननुसार, चांदीचा भावही 3,500 रुपये किंवा चार टक्क्यांनी घसरून 87,500 रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 91,000 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

सोने 3,350 रुपये किंवा 4.6 टक्क्यांनी घसरून 72,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोमवारी  सोन्याचा भाव 75,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. दरम्यान, 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 3,350 रुपयांनी घसरून 71,950 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 75,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.