सोने-चांदी दरात वाढ; काय आहे आजचा भाव

आज 8 जूनपासून सराफा बाजार सुरु होताच...

Updated: Jun 8, 2020, 02:38 PM IST
सोने-चांदी दरात वाढ; काय आहे आजचा भाव title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : आज 8 जूनपासून सराफा बाजार सुरु होताच, सोन्याच्या दरांत मोठ्या वाढीची नोंद झाली आहे. सकाळी 9.30 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं जवळपास 186 रुपयांच्या वाढीसह 45 हजार 884 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकं आहे. तर MCXवर चांदी 404 रुपयांच्या वाढीसह 47 हजार 755 रुपये प्रति किलो इतकी आहे.

दिल्लीत सराफा बाजार 8 जूनपासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली. 80 दिवसांनंतर सोन्याची दुकानं पुन्हा सुरु होत आहेत. दिल्लीत सराफा बाजारात सोशल डिस्टंन्सिंग राखण्यासाठी एन्ट्री आणि एक्झिट असे केवळ दोनच गेट उघडण्यात येणार आहेत. दुकानात येणाऱ्या लोकांना गेटवर सॅनिटाईझ करण्याची सुविधा करण्यात आली आहे.

सोन्याचा दर सध्या (Gold rates today) 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटनुसार, 2021 पर्यंत सोन्याचा दर 80 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकत असल्याचा अंदाज आहे. 

Unlock 1 : राज्यात आजपासून‌ काय सुरू होणार?

बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज विश्लेषकच्या अंदाजानुसार, 2021च्या शेवटापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रति औसपर्यंत पोहचू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारा सोन्याचे दर औंसनुसार ठरतात. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम वजन असतं. त्यामुळे एक ग्रॅम सोन्याची किंमत 8075 रुपये इतकी असते. त्यानुसार, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार 753 रुपये इतकी होते. 

कोरोनाचा कहर अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करत आहे. कोरोनामुळे जागतिक आर्थिक बाजारात, शेअर मार्केटमध्येही अनिश्चिततेचं वातावरण आहे. देशात, जगभरात आर्थिक संकटाच्या काळात गुंतवणूकदारांची, गुंतवणूकीसाठी पहिली पसंती सोन्यालाच असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 

घरबसल्या जिंका १ लाख रुपये, मोदी सरकार देतंय संधी

सवलतीच्या दरात सोनं खरेदीची संधी, ऑफर केवळ १२ जूनपर्यंत