Gold Price today | 5 महिन्यानंतर सोनं 50 हजाराच्या पार; चांदीच्या दरांमध्येही मोठी उसळी

परदेशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळवला आहे. अशातच नवीन वर्षात सोन्यात तेजी नोंदवली जाऊ शकते.

Updated: Nov 12, 2021, 02:25 PM IST
Gold Price today | 5 महिन्यानंतर सोनं 50 हजाराच्या पार; चांदीच्या दरांमध्येही मोठी उसळी  title=

मुंबई : सोने-चांदीचे भाव सध्या वाढताना दिसत आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि लग्नसमारंभामध्ये सोन्याची मागणी वाढते. शुक्रवारी सोन्याच्या दरांमध्ये 5 महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन ऍंड ज्वेलर्स असोशिएशन (IBJA)च्या संकेतस्थळानुसार शुक्रवारी सोन्याच्या दरांनी पुणे, दिल्ली, चैन्नईमध्ये 50 हजार प्रति तोळ्याचा टप्पा पार केला होता. तसेच चांदीचे दर 67 हजार प्रति किलोच्या पुढे गेले होते. 

मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये (MCX) 3 डिसेंबर 2021 च्या वायदे बाजारात सोन्याचे भाव 49,111 रुपये प्रति तोळे इतकी ट्रेड करीत होते. तर चांदी 66863 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होती. 

देशातील मेट्रो शहरांमधील प्रतितोळे 24 कॅरेट सोन्याचा भाव
नवी दिल्ली 52,420
मुंबई 49,270
चेन्नई 50,460
कोलकाता 51,200
पुणे 50,480

चांदीच्या दरांमध्ये मोठी उसळी
शुक्रवारी मुंबईतील सराफा बाजारात चांदीने पुन्हा एकदा तेजी नोंदवली. गुरूवारी तब्बल 1800 रुपये प्रति किलो आणि आज 600 रुपये प्रति किलोने चांदीत वाढ झाली. आज चांदीचा भाव 67100 रुपये प्रति किलो इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1861.14 डॉलर प्रति औंस वर पोहचले आहे.तसेच चांदी देखील 25 डॉलर प्रति औंसवर पोहचली आहे.