मुंबई : जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर किंमतीमध्ये बर्यापैकी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात एमसीएक्सचे (MCX) एप्रिल वायदा ४७,००० रुपयांच्या जवळ होते, आज ते ४५,००० च्या खाली घसरले आहे. सोमवारी सोन्याचे एमसीएक्स (MCX) एप्रिल वायदाप्रमाणे ४५,७०० च्या वर व्यापार करत होते, परंतु शेवटच्या काही तासांत बाजारात मोठी विक्री झाली आणि त्यामुळे ४०० रुपयांहून अधिक घसरले आहे.
एमसीएक्सवरील सोन्याचा एप्रिल वायदा दरात १० ग्रॅम २०० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. सध्या ते प्रति १० ग्रॅम ४५,१०० रुपयांच्या आसपास व्यापार करीत आहेत. तसेच सोने ४५ हजारच्या खाली घसरले आणि ४४९८४ च्या खालची पातळी गाठली. गेल्या दोन दिवसांत सोन्याचे दर सुमारे ६०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
गेल्या आठवड्यात सोमवारी एमसीएक्सवरील सोन्याचे एप्रिल वायदा ४६९०१ रुपयांवर बंद झाले होते परंतु शुक्रवारी ते प्रति १० ग्रॅम ४७,७३६ रुपयांवर बंद झाले म्हणजेच ते प्रति १० ग्रॅम ११६५ रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी एमसीएक्सचे सोनेदेखील ४५६११ रुपयांच्या पातळीवर घसरण झाली.
मागील वर्षी, कोरोना संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट २०२० मध्ये, एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याची किंमत ५६,१९१ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. मागील वर्षी सोन्याने ४३% रिर्टन दिले होते. उच्च पातळीच्या तुलनेत सोन्याचे दर २४ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत, सोन्याचे दर १० ग्रॅम ४५,००० रुपयांच्या एमसीएक्स पातळीवर ट्रेड होत आहे, म्हणजेच ते साधारण ११,२०० रुपयांनी स्वस्त होत आहे.
वार सोन्याचे दर
सोमवार ४६९०१
मंगळवार ४६८०२
बुधवार ४६५२२
गुरुवार ४६२४१
शुक्रवार ४५७३६
MCX Silver : सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एमसीएक्सवरील चांदीचा मार्च वायदा १०० रुपयांच्या किंचित वाढीसह बंद झाला. आज चांदीच्या मोठ्या घसरणीसह सुरुवात झाली आहे. चांदी प्रति किलो १००० रुपयांच्या घसरणीसह व्यापार करीत आहे, चांदी सध्या ६६४०० रुपयांच्या पातळीवर ट्रेड करीत आहे.
संपूर्ण आठवड्यात चांदी सोमवारी ७४४०० रुपयांवर बंद झाली. शुक्रवारी चांदी प्रति किलो ६७२६१ रुपये प्रतिकिलोवर बंद झाली आहे. म्हणजे चांदी गेल्या आठवड्यात ३१७१ रुपयांनी स्वस्त झाली आहे. शुक्रवारी चांदी देखील घसरूण ६६५०५ रुपये प्रति किलोवर आली.
१ फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवरील चांदीचा वायदा बजेटच्या दिवशी वाढून ७४,४०० रुपयांवर गेला. चांदीची उच्च पातळी प्रति किलो ७९,९८० रुपये आहे. यानुसार चांदीदेखील उच्च स्तरावरून सुमारे १३,५००रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज चांदीचा मार्च वायदा दर किलो ६६४०० रुपयांवर ट्रेड करीत आहे.
वार चांदीचे दर
सोमवार ७०४३२
मंगळवार ६९३४१
बुधवार ६९५४३
गुरुवार ६९२७६
शुक्रवार ६७२६१
(IBJA) आयबीजेएच्या वेबसाइटने दिलेल्रया माहितीनुसार १ मार्च रोजी, देशातील २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ४५९७६ रुपये आहे तर २६ फेब्रुवारी रोजी बाजार बंद होताना दर १० ग्रॅम प्रति ४६५७० रुपये होता. त्याचप्रमाणे सराफा बाजारात चांदीचा दर ६८६२१ रुपये प्रति किलो, तर २६ फेब्रुवारी रोजी हा दर ७०२२५ रुपये प्रति किलो होता. आज पुन्हा एकदा किंमती कपात दिसून येत आहे.