Bank holidays March 2021 : बँकेची काम आताच करा, मार्चमध्ये इतके दिवस बँका बंद

बँकांची कामे लवकरच आटपून घ्या 

Updated: Mar 2, 2021, 03:28 PM IST
Bank holidays March 2021 : बँकेची काम आताच करा, मार्चमध्ये इतके दिवस बँका बंद title=

मुंबई : 2021 वर्षातील मार्ट महिन्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात नेमकं कोणत्या दिवशी बँका बंद (Bank holidays March 2021) राहणार हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. यानुसार, आपण आपले कामाचे दिवस ठरवू शकतो. 

मार्च महिन्यात भारतभर बँका तब्बल 11 दिवस बंद राहणार आहे. आरबीआयने जाहिर केलेल्या कॅलेंडरनुसार बँका बंद राहणार आहेत. या मार्च महिन्याच्या सुट्यांमध्ये चार रविवार आणि दोन शनिवारचा समावेश आहे. तसेच 5 दिवस इतर सुट्यांमुळे देखील बँका बंद राहणार आहेत. 

त्याचप्रमाणे या महिन्यात बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. सरकारी बँकांचे होत असलेले खासगीकरण याला विरोध करत बँक कर्मचारी हा संप पुकारणार आहेत. मार्च महिन्यातील 15 आणि 16 मार्चला दोन दिवस हा संप असणार आहे. तसेच बँका पार्लमेंटच्या दिशेने मोर्चा 10 मार्चला काढणार आहेत. त्या दिवशी देखील बँका बंद राहतील. 

Bank Holidays in March 2021

5 मार्च 2021 : मिझोरममध्ये Chapchar Kut निमित्त बँकांना सुट्टी 

7 मार्च 2021 : या दिवशी रविवार म्हणून बँकांना सुट्टी 

11 मार्च 2021 : महाशिवरात्रीनिमित्त बँका बंद राहतील

13 मार्च 2021 : दुसरा शनिवारी असल्यामुळे बँका बंद राहतील.

14 मार्च 2021 : रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील 

21 मार्च 2021 : रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील 

22 मार्च 2021 : बिहार डे. या दिवशी फक्त बिहारमधील बँकांना सुट्टी 

27 मार्च 2021 : चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहतील. 

28 मार्च 2021: रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील 

29 मार्च 2021: या दिवशी होळी आहे. या दिवशी गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड, सिक्कीम, तेलंगणा, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, गोवा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मेघालय आणि हिमाचल प्रदेशात बँकांना सुट्टी असणार आहे.

30 मार्च 2021: बिहार राज्यात होळीच्या निमित्ताने बँकाना सुट्टी असेल.