Gold and Sliver Rates: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी महागणार? जाणून घ्या आजचे दर

Gold and Sliver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात महागाईचा (Inflation) फटका बसतो आहे. त्यामुळे त्याचा फटाका किमोडिटी एक्सचेंजही (Commodity Exchange) होईल. सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे कळते आहे. जाणून घेऊया आजचे सोन्याचे-चांंदीचे (Gold and Silver) रेट्स काय आहेत? 

Updated: Mar 16, 2023, 12:28 PM IST
Gold and Sliver Rates: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी महागणार? जाणून घ्या आजचे दर title=
Gold and sliver price today see the latest rates of gold and sliver in your city

Gold and Sliver Price Today: सध्या सणासुदीचा आणि लग्नसभारंभांचा मौसम (Wedding Season) आहे त्यामुळे सगळीकडेच सोनं आणि चांदी खरेदीसाठी (Festive Season Shopping) लगबग सुरू आहे. यंदा गुढीपाडव्याचा आणि रामनवमीचाही (Gudi Padwa) मुहूर्त आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीला मोठं उधाण आलं आहे. कालच्या किमतींनुसार 24 कॅरेटचं (Pure Gold) 8 ग्रॅम सोनं हे 45,344 रूपये प्रति ग्रॅम होते. तर 1 ग्रॅम सोनं हे 5,668 रूपये इतकी किंमत होती. तर 22 कॅरेट सोनं (Standard Gold) हे 8 ग्रॅमसाठी 43,184 रूपये तर 1 ग्रॅमसाठी 5,398 रूपये एवढी किंमत होती. आज सोन्याचा भाव हा 24 कॅरेट सोन्याचा 56,680 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका समोर येतो आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 53,980 प्रति 10 ग्रॅम असा आहे. (Gold and sliver price today see the latest rates of gold and sliver in your city)

आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे परिस्थिती?

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहेत. त्यातून गोल्ड प्राईसमध्ये आणि सिल्व्हर प्राईझमध्येही (Gold and Sliver Price) मोठी तफावत दिसते आहे. त्यातून आता येणाऱ्या काळात हे भाव वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात महागाईचेही लोड उठताना दिसत आहेत. त्यामुळे याचा पडसाद म्हणून सर्वत्र सोन्याचेही दर वाढण्याची शक्यता आहे. 

कशा वाढतायेत सोन्याच्या किमती? 

बुधवारच्या सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. त्यातून मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) काल सोन्याच्या आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायाला मिळाली. मधल्या काही दिवसांपासून 58,000 रूपयांची वाढ सोन्याच्या दरात झाली आहे तर काही दिवसांनी हेच सोनं मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर 66 रूपयांनी घसरले होते. तर चांदी 71,000 वरून 273 रूपयांनी घसरले होते. 

चांदीच्या दरात काय वाढ?

येत्या काही दिवसांत चांदीच्या किमती पाहता 80,000 प्रति किलोनं वाढू शकतं. परंतु त्यातून सराफा बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळते आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या चांदीचे दर हे 71,000 रूपये प्रति किलो आहे. सोनं आणि चांदीची गुंतवणूक (Gold Investment) करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. 

हेही वाचा - तुमच्या बँक खात्यात 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे? मग वाचा 'हे' नियम

त्यातून आता येत्या काही काळात महागाईच्या पार्श्वभुमीवर आपल्याला सोने आणि चांदीच्या दर चढउतार दिसली तरी किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आणि ग्राहकांनी येत्या काळात सोनं आणि चांदीच्या दराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सध्या सोन्यापेक्षा चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु किमोडिटीच्या (Commodity) तुलनेत सोनं खूप महाग झालं आहे.