Gold Silver Rate on 4 April 2023 : सोने आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोने-चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरातही आज घसरण झाली आहे. त्यामुळे आज तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर हीच सूर्वणसंधी आहे. दरम्यान सोने आणि चांदीच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी चढ-उतार पाहायला मिळते आणि चालू आठवड्यात सोन्यावर खरेदीदार आणि गुंतवणूकदार खरेदीसाठी तुटून पडले. आणि आज पुन्हा एकदा खरेदीदारांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.
आज, मंगळवारी गुड रिटर्न्स किंवा वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,700 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 59,670 रुपये आणि आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 740 रुपये आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,670 प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम पुण्यचा दर 54,700 एसेल आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,700 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,670 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,730 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,700 रुपये आहे. प्रति 10 ग्रॅम चांदीचा आजचा दर 740 रुपये आहे.
वाचा : पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल, येथे चेक करा नवे दर
चेन्नई - 60,380 रुपये
दिल्ली -59,820 रुपये
हैदराबाद -59,670 रुपये
कोलकाता - 59,670 रुपये
लखनौ - 59,820 रुपये
मुंबई - 59,670 रुपये
पुणे - 59,670 रुपये
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.