अर्रर्र...ग्राहकांना धक्का! सोने-चांदी पुन्हा महाग, खरेदीदारांना मोजावे लागतील 'इतके' रुपये

Gold Rate Today : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा..., कारण सोने खरेदीसाठी आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. कारण पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर दिसून येईल.

श्वेता चव्हाण | Updated: May 6, 2023, 09:44 AM IST
अर्रर्र...ग्राहकांना धक्का! सोने-चांदी पुन्हा महाग, खरेदीदारांना मोजावे लागतील 'इतके' रुपये title=
Gold Silver Price on 6 May 2023

Gold Silver Price on 6 May 2023 : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. परिणामी तुम्ही जर सोने खरेदी करायला गेलात, तर तुम्हाला खरेदीसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. कारण पुन्हा एकदा सोन्याच्या दरात (Gold Rate) वाढ झाली आहे. यामध्ये केवळ सोनेच नाही तर चांदीच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने 62,400  रुपये आणि चांदी 78,250 रुपयांना विकली जाऊ शकते. सोने चांदीच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. 

सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात (Today gold rate) 220 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आजही तुम्हाला 22 कॅरेट सोने खरेदीसाठी प्रति दहा ग्रॅम 57,200 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट सोन्यासाठी 62,400 रुपये मोजावे लागतील. 

चांदीच्या किमतीत वाढ

तर दुसरीकडे सोन्यासोबत चांदीच्या ही दरात वाढ होताना दिसत आहे. जागतिक बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर आज चांदीच्या दरात जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आज 1 किलो चांदी (Today Silver Price) खरेदी करण्यासाठी 78,250 रुपये मोजावे लागतील. काल चांदी 77,100 रुपये किलोनी विकली जात होती. म्हणजेच आज चांदीचा दरात 1150 रुपयांनी वाढ झाली आहे. 

वाचा: महाराष्ट्रात Petrol-Diesel स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

mcx फ्युचर्स मार्केट स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. एमसीएक्सवर सोन्याचा जून फ्युचर्स 535 रुपयांच्या वाढीसह 61,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी चांदीचा जुलै वायदा 1488 रुपयांच्या वाढीसह 78,070 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

सोन्याची शुद्धता अशा प्रकारे तपासा

तुम्ही घरी बसूनही सोन्याची शुद्धता तपासू शकता. यासाठी सरकारने 'BIS केअर अॅप' नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहक घरी बसून सोन्याची शुद्धता तपासू शकतात. दुसरीकडे, ग्राहकाची काही तक्रार असेल तर तो या अॅपच्या मदतीने करू शकतो. 

सोन्याच्या दागिन्यांसाठी नवीन नियम

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी नियमात बदल केले आहेत. 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे. याबाबत भारतीय मानक ब्युरो (BIS) ने सांगितले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोने विकू शकणार नाही.