खुशखबर! महाराष्ट्रात Petrol-Diesel स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून लोक पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत. आज अशा सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 6, 2023, 08:03 AM IST
खुशखबर! महाराष्ट्रात Petrol-Diesel स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर   title=
Petrol Diesel Price on 6 May 2023

Petrol Diesel Price on 6 May 2023 : इंधनाची वाढ ही केवळ भारतीय समस्या नसून ती जागतिक समस्या बनली आहे. आधी कोरोना (Corona Update) महामारी त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धाने जगाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून सोडले होते. त्यामुळे भारतासह सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel Rate) दरांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यातच आता वाढत्या महागाईत जनतेला दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे इंधन दरात कपात केली जाणार आहे.  त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) काय आहेत ते जाणून घेऊया.

आज (6 मे 2023) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. WTI क्रूड 4.05 टक्क्यांनी वाढून $71.34 प्रति बॅरलवर पोहचले आहे. तर दुसरीकडे ब्रेंट क्रूड 3.86 टक्क्यांच्या वाढीसह $ 75.30 वर विकले जात आहे.  भारतात दररोज सकाळी ६ वाजता देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करतात. त्यानुसार महाराष्ट्रात पेट्रोलचे दर (Maharashtra Petrol Price) स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

वाचा : Mumbai Local चा शनिवारपासूनच पॉवर ब्लॉक; रविवारी कोणत्या मार्गावरून धावणार रेल्वे, कुठे वाहतूक ठप्प? पाहा

 गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल स्वस्त तर काही भागात पेट्रोल महाग मिळत होते. मात्र आज महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 43 पैशांनी तर डिझेलच्या दरात 42 पैशांची घट झाली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशात पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी स्वस्त होत आहे.  त्याचवेळी उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल 33 पैशांनी महागले आहे. पश्चिम बंगालमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 46 आणि 43 पैशांनी वाढ झाली आहे. याशिवाय त्रिपुरा, तेलंगणा, मिझोराम आणि पंजाबमध्येही इंधन कालच्या तुलनेत आज थोडे महागले आहे.

SMS द्वारे चेक करा पेट्रोलचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तुम्हाला SMS द्वारे कळू शकतात. इंडियन ऑइलच्या ग्राहकांना 9224992249 या नंबरवर RSP लिहून पाठल्यास तुम्हाला आजचे नवीन दर समजतील. यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर जाण्याची गरज भासणार नाही. 

 तसेच BPCL चे ग्राहकांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर ही आजचे दर कळू शकतात. यासाठी मोबाईल मेसेजमध्ये RSP लिहून 9223112222 या नंबरवर मेसेज पाठवावा. त्यानंतर कंपनी तुम्हाला एसएमएसद्वारे अपडेट दर देईल. तर HPCL ग्राहकांना 9222201122 या नंबरवर HPPprice म्हणून एसएमएस पाठवावा लागेल.