वर्षाच्या शेवटच्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर

२०१७ वर्षाच्या शेवटच्या दिवशी व्यवसाय सत्रात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. या दरवाढीमुळे सोन्याच्या दराने ३० हजारी पार केली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 30, 2017, 11:13 PM IST
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर title=
File Photo

मुंबई : २०१७ वर्षाच्या शेवटच्या दिवशी व्यवसाय सत्रात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. या दरवाढीमुळे सोन्याच्या दराने ३० हजारी पार केली आहे.

सोन्याच्या किंमतीत वाढ

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

पाहा प्रति तोळा किती रुपये आहे सोनं

सोन्याच्या दरात १७५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर ३०,४०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचल्याचं पहायला मिळालं.

चांदीचा दरही वाढला

शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी वाढल्याने चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात २८० रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचा दर ३९,९८० रुपयांवर पोहोचला आहे.

...म्हणून झाली घसरण

बाजारातील सूत्रांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या किंमतीत झालेली घसरण आणि राजकीय अस्थिरतेमुळे परदेशात सोनं १३०२.५० डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. हा महिन्याभरातील उच्चांक आहे.

२०१७ या वर्षात सोन्याच्या किंमतीत एकूण २,१०० रुपये किंवा ७.४२ टक्क्यांनी वाढ झाली. तर, चांदी ५८० रुपये किंवा १.४७ टक्क्यांनी मजबूत राहीली.

न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किंमतीत वर्षाच्या शेवटी १३.१७ टक्क्यांची वाढ होत १३०२.५० वर स्थिरावलं. गेल्यावर्षी ११५०.९० डॉलर प्रति औंसवर बंद झालं होतं. तर, चांदी ६.४८ टक्क्यांच्या वाढीने १६.९१ डॉलर प्रति औंसवर स्थिरावला.

९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर

राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर १७५-१७५ रुपयांची वाढत अनुक्रमे ३०,४०० आणि ३०,२५० रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात २५ रुपयांनी घट झाली होती.