Gold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर

Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 13, 2023, 07:08 AM IST
Gold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर title=

Gold and silver Rate: गणपती बाप्पाचे आगमन एका महिन्यावर आले आहे. रक्षाबंधनही काही दिवसांवर आले आहे. हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे सणा सुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. या शुभ दिवसांच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदीची संधी कोणी सोडत नाही. त्यामुळे सोने, चांदीचे दर जाणून घेऊया. 

या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन या आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजे 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे. इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोशिएशन (IBJA) ने यासंदर्भात माहिती दिली.

Success Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस

चांदीची किंमतही घसरली

IBJA च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात चांदीमध्ये दीड हजार रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 71 हजार 925 रुपये होती. ज्याची किंमत आता 70 हजार 098 रुपये प्रति किलोवर आली आहे. म्हणजेच या आठवड्यात चांदीची किंमत 1 हजार 827 रुपयांनी कमी झाली आहे.

जुलैमध्ये सोन्याच्या दरात वाढ 

गेल्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली होती. जुलैच्या सुरुवातीला म्हणजे 3 जुलै रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 58 हजार 139 रुपये होते (बाजार 1 आणि 2 जुलै रोजी बंद होता), जो 31 जुलै रोजी 59 हजार 567 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच त्याची किंमत 1 हजार 428 रुपयांनी वाढली होती.

सोने दोन वर्षांत 27% परतावा देण्याची शक्यता 

सोन्याच्या किंमतीत काही महिन्यांचा सौम्य दिलासा मिळाल्यानंतर दरात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. या किंमती कमी करण्यासाठी अमेरिका आणि युरोपमध्ये व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सर्व विक्रमी उच्चांक मोडल्यानंतर शेअर बाजार नफावसुलीच्या दबावाखाली आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणुकीसाठी वातावण तयार होत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक पुढच्या दोन वर्षांत 27% पेक्षा जास्त परतावा देऊ शकते, असे मत केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी व्यक्त केले आहे.

सोने सध्या फ्युचर्समध्ये 60 हजार रुपयांच्या खाली आणि सराफा बाजारात 59 हजार 500 रुपयांच्या खाली आहे. या वर्षी 65 हजार आणि जून 2025 पर्यंत ते 75 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. आता गुंतवणूक केल्यास सोने दोन वर्षांत 27% परतावा देऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नेहमीच्या खर्चात थोडी बचत करुन दरमहा थोडे सोने खरेदी केल्यास लॉंग टर्मसाठी तुम्हाला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.