मुंबई : ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या दरांच्या टेक्निकल चार्टमध्ये 1700 डॉलर आणि 1680 डॉलर म्हणजेच 45000 ते 44800 रुपये प्रति 10 ग्रॅम वर सपोर्ट दिसून येत आहे. त्यामुळे या लेवल नंतर येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊन दर 48 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहचू शकतात. असे मत आयआयएफएल सेक्युरिटीचे व्हिपी (रिसर्च) अनुज गुप्ता यांनी म्हटले आहे.
तसेच चांदीच्या टर्म दरांमध्ये 20 डॉलर म्हणजेच 56000 प्रति किलोचा रेजिस्टंस्ट आहे. गुंतवणूकदारांना 56 हजार रुपयांपासून 65 हजारांचे लक्ष ठेऊऩ गुंतवणूकीचा सल्ला देण्यात आला आहे.
केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडीया यांनी म्हटले की, सोन्याच्या दरांसाठी 45 हजार रुपये प्रति तोळ्याच्या चांगला सपोर्ट आहे. येणाऱ्या दसरा, दिवाळी सणांच्या कालावधीत सोन्याचे दर देशात 47 हजार किंवा त्यापेक्षाही पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच चांदीच्या दरांसाठी 54 हजार रुपये प्रति किलोचा सपोर्ट आहे. येत्या 3 ते 6 महिन्यात चांदीचे दर 45 हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
मुंबईतील आजच्या सोन्याचे दर 46110 रुपये प्रति तोळे आहे. तर चांदीचे दर 58 हजार रुपये प्रति किलो इतके आहेत.