दिवाळीआधी सोनं-चांदीचे भाव वाढले

दिवाळी आणि परदेशी बाजारपेठेमधल्या मजबुतीमुळे दिल्लीच्या सराफ बाजारामध्ये सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत.

Updated: Oct 4, 2017, 10:43 PM IST
दिवाळीआधी सोनं-चांदीचे भाव वाढले  title=

नवी दिल्ली : दिवाळी आणि परदेशी बाजारपेठेमधल्या मजबुतीमुळे दिल्लीच्या सराफ बाजारामध्ये सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत. बुधवारी सोन्याच्या भाव ५० रुपयांनी वाढून ३०,६०० रुपये तोळा झाला आहे. तर चांदी २५० रुपये किलोनं वाढून ४०,४५० रुपये प्रति किलो झाली आहे.

जागतिक बाजारामध्ये डॉलर कमकुवत झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दिल्लीमध्ये ९९.९ शुद्धता असलेल्या सोन्याचे भाव ३०,६०० रुपये तोळा तर ९९.५ शुद्धता असलेलं सोनं ३०,४५० रुपये तोळा आहे.