पणजी : गोव्यात भाजपने काँग्रेसला दे धक्का दिला. काँग्रेसचे १० आमदार फोडून भाजप सरकार अधिक मजबूत बनविले आहे. दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांपैकी काहींना मंत्रिपद दिले जाणार आहे. त्यामुळे भाजप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे गोव्यात आज संध्याकाळी ४ वाजता मंत्री पदासाठी शपथ विधी सोहळा होत आहे. या पारर्श्वभूमीवर गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी आपल्या पदाचा राजीनामा सभापती राजीनामा सभापती राजेश पटणेकर यांच्याकडे दिला आहे.
Goa CM seeks resignations of four ministers
Read @ANI story | https://t.co/62b5CbhmQs pic.twitter.com/wuoIx1wksE
— ANI Digital (@ani_digital) July 12, 2019
मायकल लोबो यांना मंत्री करण्यात येणार आहे. ते आज मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.गोव्यातील राजकीय घडामोडीचा अखेरचा अंक आज संपणार आहे. आज संध्याकाळी ४ वाजता गोवा राजभवन येथे काँग्रेसमधून आलेल्या आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हे उपमुंख्यमंत्री होतील. अन्य बाबुश मॉनसोरात मायकल लोबो आणि फिलिप रोडरिग्स यांचा समावेश आहे.
Goa Assembly Speaker Rajesh Patnekar: Though new ministers are being inducted,assembly will go on as per schedule. New Ministers will have to study their portfolios while answering questions on floor of the House. Congress will have to give name of leader of opposition by 15 July pic.twitter.com/LIcd18QjT3
— ANI (@ANI) July 13, 2019
तर विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर आणि रोहन खवटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. गोवा फॉरवर्ड या पक्षाला भाजपने मोठा धक्क्का दिला आहे. गोव्यात नेमके काय घडत आहे, याकडे लक्ष लागले होते.