Brokerage Picks | या धमाकेदार शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने मिळणार दमदार रिटर्न्स, दिग्गज ब्रोकरेज हाऊसचा दावा

रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.

Updated: Aug 9, 2021, 03:24 PM IST
Brokerage Picks | या धमाकेदार शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने मिळणार दमदार रिटर्न्स, दिग्गज ब्रोकरेज हाऊसचा दावा title=

मुंबई : रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो. 

आज आम्ही तुमच्यासाठी M&M, Bank of Baroda, Alkem Laboratories,  IPCA Laboratories, Hindalco Industries, Divi's Laboratories, Tata Power Company, Zee Entertainment या शेअर्सची निवड केली आहे. 

M&M
महिंद्रा आणि महिंद्रामध्ये दिग्गज ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टेनलेने ओवरवेट रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी 1158 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. ब्रोकरेज हाऊस नोमुरानेही या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 1085 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. जून तिमाहीमध्ये ऑटोमोटिव सेगमेंटमध्ये 6050 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यात दरम्यान कंपनीने 85 हजार 858 वाहनं विकली आहेत. त्यामुळे येत्या काळातही कंपनीच्या ग्रोथचा अंदाज चांगला आहे.

Hindalco Industries

मेटल सेक्टरमधील दिग्गज कंपनी हिंदाल्कोच्या शेअरसाठी ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने ओवरवेटची रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी 500 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले होते. ते वाढवून आता 540 रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच ब्रोकरेज हाऊस सिटीने देखील या शेअरचे लक्ष 535 रुपये ठेवले आहे.

Divi's Laboratories
ब्रोकरेज हाऊस गोल्डमॅन सॅक्सने Divi's Laboratories मध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 5240 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. HSBC ने देखील या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

Tata Power Company
टाटा पावरमध्ये जेपी मॉर्गनने ओवरवेट रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी 155 रुपयांचे लक्ष दिले आहे. तसेच मॅक्कारीने या शेअरसाठी अंडरपरफॉर्म रेटिंग देवून त्यासाठी चे लक्ष 101 रुपये ठेवले आहे.

Alkem Laboratories
जेपी मॉर्गनने Alkem Laboratories मध्ये खरेदीचा सल्ला देवून 3750 रुपयांचे लक्ष दिले आहे. 

IPCA Laboratories
ब्रोकरेज हाऊस जेफरीजने IPCA Laboratories मध्ये 2547 रुपयांच्या टार्गेटसाठी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. मॉर्गन स्टॅनलेने इक्वल वेट रेटिंग देत शेअरचे लक्ष 2203 रुपये दिले आहे. 

Zee Entertainment
ब्रोकरेज हाऊस CLSAने Zee Entertainment मध्ये 306 रुपयांच्या टार्गेटसह खरेदीचा सल्ला दिला आहे.