बैलासमोर रील बनवण्याचा तिचा हट्टं, पण त्यानंतर जे काही घडलं, ते अजबच... पाहा व्हिडीओ

आजकाल तुम्ही कुठेही पाहिलंतर, तरी तुम्हाला एक तरी व्यक्ती असा दिसेल जो शॉट्स किंवा रील्स बनवत आहे.

Updated: Jun 6, 2022, 09:38 PM IST
बैलासमोर रील बनवण्याचा तिचा हट्टं, पण त्यानंतर जे काही घडलं, ते अजबच... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आजकाल तुम्ही कुठेही पाहिलंतर, तरी तुम्हाला एक तरी व्यक्ती असा दिसेल जो शॉट्स किंवा रील्स बनवत आहे. खरंतर असं करुन लोकांना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही गोष्टी मिळतात. ज्यामुळे ते हे सगळं करत असतात. तसेच काही लोक फक्त आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकण्यासाठी आपल्या प्रवासाचा, ऑफिसमधल्या एखाद्या प्रसंगाचा फोटो शेअर करतात.

परंतु कधी कधी होतं असं की, रील बनवण्याच्या प्रक्रियेत बरेचदा लोक स्वतःला अडचणीत आणतात. अनेक वेळा या प्रकरणात लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. त्याच वेळी, कधीकधी लोकांना त्यांचे प्राण वाचवणे कठीण होते.

सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी रील्स बनवत असते, परंतु तेवढ्याच तेथे एक बैल येतो. खरंतर या बैलाला अचानक काय होतं माहित नाही, परंतु तो त्या मुलीच्या अंगावर धावून जातो. ज्यानंतर ही मुलगी आपला जीव वाचवून तेथून बाजूला होते. यानंतर मुलीचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहे.

हा व्हिडीओ तसा धोकादायक असला तरी,  तुम्हाला तो व्हिडीओ पाहून हसायला येईल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर बरेच लोक हा व्हिडीओ पाहून कमेंट करत आहेत की, कदाचित बैलाला दीदीचा डान्स आवडला नसणार, म्हणून त्याने या मुलीसोबत असं केलं आहे.

bhutni_ke_memes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लाटफॉर्म इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे.