Girl Dance Video: सपना चौधरीच्या गाण्यावर ती वरातीत बेभान होऊन नाचली; तरुणीचा भन्नाट डान्स Viral

Girl Dance In Shadi Viral Video: अचानक गाणं बदलल्यानंतर ही तरुणी मंचावर येते आणि सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स करु लागते. तिचा डान्स पाहून सर्वच उपस्थित लोक टाळ्या वाजवून तिचं कौतुक करताना दिसतात.

Updated: Jan 24, 2023, 06:31 PM IST
Girl Dance Video: सपना चौधरीच्या गाण्यावर ती वरातीत बेभान होऊन नाचली; तरुणीचा भन्नाट डान्स Viral title=
Girl Dance In Shadi Viral Video

Dance Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे (Social Media Dance Video) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचा डान्स तर कधी वयस्कर व्यक्तींचे डान्स सोशल मिडियावर (Social Media) कायमच लक्ष वेधून घेतात. तरुणांच्या डान्सबद्दल तर बोलावं तितकं कमी आहे. अनेकजण अशा काही भन्नाट स्टेप्स करतात की ते व्हिडीओ पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका तरुणीचा लग्नाच्या वरातीमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी सपना चौधरीच्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणीने लग्नसमारंभात डान्स करतच स्टेजवर येते आणि आपल्या अदाकारीने लोकांची मनं जिंकते.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अचानक ही तरुणी स्टेजवर येऊन नाचू लागत असल्याचं दिसते. या तरुणीने पूर्ण श्रृंगार केल्याचं दिसून येत आहे. पिवळ्या रंगाची साडी, मोठं मंगळसुत्र, हातात बांगड्या असा लग्नाला आल्याच्या लूकमध्ये ही तरुणी दिसते. लग्नामध्ये डीजे गाणी वाजवत असताना कोणीही नाचत नसतं. मात्र अचानक गाणं बदलतं आणि सपना चौधरीचं 'तेरी आंख्या का यो काजल' हे गाणं वाजू लागतं. हे गाणं ऐकताच समोरच्या प्रेक्षकांच्या गर्दीत बसलेली साडी नेसलेली तरुणी समोर येते आणि स्टेजवर जाऊन नाचू लागते. ती अशा काही भन्नाट स्टेप करते की तिलाही त्यावर विश्वास बसत नाही असं तिच्या एक्सप्रेशनवरुन वाटतं. ती पूर्णपणे या डान्समध्ये तल्लीन झालेली दिसते. म्युझिक वाजू लागताच तिचे पाय थिरकू लागतात आणि सर्वच उपस्थितांना आपल्या डान्सने भूरळ घालते.

या मुलीच्या डान्सला उपस्थित लोकही टाळ्या वाजवून दाद देतात. आजूबाजूला बसलेले वयस्कर लोक आणि महिलाही तिच्या या डान्सला टाळ्या वाजवून दाद देताना दिसतात.

सपना चौधरीलाही मागे टाकाल

डान्सचा हा व्हिडीओ कॅट श्रद्धा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी या तरुणीचं कौतुक केलं आहे. अगदी मनमोकळेपणे या तरुणीने केलेला डान्स अनेकांना भावला आहे. फार छान डान्स केलास अशा प्रतिक्रिया काहींनी नोंदवल्यात. एकाने तर या तरुणीचा डान्स पाहून तुम्ही सपना चौधरीलाही मागे टाकाल इतका सुंदर डान्स केला आहे, असं म्हणत या तरुणीचं कौतुक केलं आहे.