बॉयफ्रेंडला रात्री घरी बोलवायची, शंका येऊ नये म्हणून आई-वडिलांना द्यायची झोपेच्या गोळ्या, 3 महिन्यांनंतर...

Trending News Today In Marathi: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तरुणीने बॉयफ्रेंडला घरी बोलवण्यासाठी आई-वडिलांसोबतच भयंकर कृत्य केलं आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 7, 2024, 10:57 AM IST
बॉयफ्रेंडला रात्री घरी बोलवायची, शंका येऊ नये म्हणून आई-वडिलांना द्यायची झोपेच्या गोळ्या, 3 महिन्यांनंतर... title=
girl called her boyfriend at night after giving her parents sleeping pills for 3 months

Trending News Today:  तरुणी रोज रात्री प्रियकराला घरी बोलवायची. पण तिचे हे गुपित आई-वडिलांसमोर येऊ नये यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. गेल्या तीन महिन्यांपासून तिचा हा कारमाना सुरू होता. एक अज्ञात मुलगा रोज रात्री परिसरात फिरतो हे शेजाऱ्यांनी पाहिल्यावर त्यांनी मुलीच्या पालकांना सांगितले. त्यांनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आले. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत कोणीतीही तक्रार दाखल केली नाहीये. (Trending News Today In Marathi)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मुलगी रोज रात्र तिच्या प्रियकराला घरी बोलवायची. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. बिलंदपूर मोहल्लात राहणाऱ्या एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. तरुणी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी तिच्या पालकांसोबतच भयंकर वागत होती. तो रात्री भेटायला येतो हे पालकांना कळू नये यासाठी ती रोज रात्री आई-वडिलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिक्स करत होती. रोज आई वडिलांना झोपेच्या गोळ्या देणे हे खूप भयंकर असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. तर, पालकांनीही आपलीच मुलगी अशी वागू शकते हे पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. 

मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून आई-वडिलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून त्यांना खाण्यासाठी देत होती. जेव्हा तिचे आई-वडिल गाढ झोपेत असत तेव्हा ती प्रियकराला घरी बोलवत होती आणि कुटुंबीयांना जाग येण्याच्या आधी त्याला तिथून जायला भाग पाडत होती. जेव्हा परिसरातील लोकांना संशय आला तेव्हा त्यांनी तिच्या वडिलांना याबाबत विचारले. 

शेजाऱ्यांनी सांगितल्यानंतर मुलीच्या वडिलांनाही थोडा संशय आला तेव्हा ते सतर्क झाले. व त्यांनी एकदिवस जेवण न जेवण्याचे नाटक केले आणि पांघरुण घेऊन झोपून राहिले. मुलीला वाटले की आई-वडिल दोघेही झोपले आहेत आणि तिने बॉयफ्रेंडला बोलवून घेतले. युवक घरी येताच मुलीचे वडिल उठले आणि त्या दोघांना रंगेहाथ पकडले. मुलीच्या वडिलांनी युवकाला मारहाण केली त्यांचा आवाज ऐकून शेजारीही आले. 

या बाबत पोलिसांना सूचना मिळताच युवकाच्या कुटंबीयांना देण्यात आली. तेव्हा युवक व युवती दोघांच्याही कुटुंबीयांमध्ये मोठा वाद रंगला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षातील वाद समजावून शांत केला. दरम्यान, या प्रकरणात आत्तापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाहीये, अशी माहिती पोलिसांनी दिली.