मुंबई : हिंसक प्राण्यांपैकी एक असलेल्या मगरीला 'वॉटर डेव्हिल' म्हणतात. पाण्यात किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कोणतेही भक्ष्य दिसले की मगर झडप घालून क्षणार्धात शिकार करू शकते. मगरी मोठ्या प्राण्यांचंही भक्ष करतात. परंतू मगरी बहुतेक वेळा शांत असतात जेव्हा संधी मिळते तेव्हा मगर लक्ष्यावर झडप घालतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मगर पोहत असताना अचानक रस्त्यावर आली. मात्र, काही सेकंदांनंतर ती गायब होते.
मगरी गोड्या पाण्यात राहतात आणि संथ नद्या, खाड्या, दलदल आणि तलाव पसंत करतात. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मगर शिकार करण्यासाठी पाण्यातून बाहेर पडते परंतू पुन्हा आत जाताना दिसली. कच्च्या रस्त्यावर बाईक उभी असताना वाहत्या नदीच्या बाहेर एक मोठी मगर दिसू शकते.
भक्षाच्या शोधात मगर अचानक नदीतून बाहेर आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. मगर त्या बांधाच्या भिंतींवर चढण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
काही सेकंदात, मगर रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाते. मगरी पाण्यात उडी मारून आत शिरते. काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
मगर बाहेर आली होती परंतू ती काही सेकंदात पाण्यात गायब कशी झाली याचेही नेटकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे. व्हिडिओ helicopter_yatra_ वापरकर्त्याने Instagram वर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.