कदाचित तुम्हीही या मंदिरात गेला असाल...एका रात्रीत भूतांनी बांधलं होतं हे शिव मंदिर!

शिवाचे मंदिर भुतांनी एका रात्रीत तयार केलं असल्याचा दावा करण्यात येतो.

Updated: Jul 13, 2022, 01:21 PM IST
कदाचित तुम्हीही या मंदिरात गेला असाल...एका रात्रीत भूतांनी बांधलं होतं हे शिव मंदिर! title=

मुंबई : भूतांच्या अस्तित्वाबद्दल प्रत्येकाचं मत भिन्न असू शकतं. यामध्ये काही जण भूतांवर विश्वास ठेवतात तर काही अशा गोष्टी नाकारतात. पण कधी-कधी अशा काही घटना किंवा अपघात घडतात ज्यामुळे तुम्हाला नक्कीच वाटेल की, जगात कुठेतरी भूत आहे. 

आज आम्ही तुम्हाला अशा एका मंदिराविषयी सांगणार आहोत ज्याबद्दल असं म्हटलं जातं की, हे मंदिर भुतांनी बनवलं होतं. हे शिवाचे मंदिर भुतांनी एका रात्रीत तयार केलं असल्याचा दावा करण्यात येतो.

भगवान शिव यांची पूजा अनेकजण करतात, मग तो देव असो किंवा दानव. म्हणूनच सर्व लोक त्यांची सारखीच पूजा करत आले आहेत. म्हणूनच हे मंदिर भुतांनी बांधलं असल्याचं म्हटलं आहे. या मंदिरात शिवाची पूजा करण्यासाठी भुतं येतात असं म्हणतात. 

हे मंदिर गुजरातच्या काठियावाडमध्ये आहे. तेव्हापासून ते नवलखा मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिराचं सौंदर्य पाहून तुमचेही मन मोहून जाईल.

हे मंदिर सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी बाबरा नावाच्या भुताने बांधलं होतं, हे नवलखा मंदिर सोमनाथच्या ज्योतिर्लिंगाप्रमाणे खूप उंच आहे. त्याची जीर्णोद्धार आणि दुरुस्ती करण्यात आली आहे.

हे मंदिर भुताने बांधले असेल, पण त्याचे सौंदर्य ते पाहूनच निर्माण होते. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिरात तुम्हाला खुजराहो आणि सोमनाथ या दोन्हींची वास्तुकला पाहायला मिळते.