इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणणाऱ्या सिद्धूंवर भडकला गंभीर, म्हणाला मुलगा-मुलीला...

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

Updated: Nov 20, 2021, 09:33 PM IST
इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणणाऱ्या सिद्धूंवर भडकला गंभीर, म्हणाला मुलगा-मुलीला... title=

नवी दिल्ली : काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शनिवारी एका कार्यक्रमात नवज्योत सिंग सिद्धू  (Navjot Singh Sidhu) यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे 'मोठे भाऊ' असे वर्णन केले आहे. सिद्धूंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir)यांनी सिद्धू यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. 

गौतम गंभीरने ट्विट केले की, 'तुमच्या मुलाला किंवा मुलीला सीमेवर पाठवा आणि मग दहशतवादी देशाच्या प्रमुखाला मोठा भाऊ म्हणा.' मात्र, गौतम गंभीरने आपल्या ट्विटमध्ये कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव घेतले नाही.

करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या वेळी पाक लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारून वादात सापडलेल्या सिद्धूने आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपला मोठा भाऊ म्हटले आहे. शनिवारी करतारपूरमध्ये दर्शनासाठी दाखल झालेल्या सिद्धू यांचे पाकिस्तानी शिष्टमंडळाने येथे स्वागत केले. पुष्पवृष्टी व पुष्पहार अर्पण करण्यात आला. सिद्धूचे स्वागत करताना करतारपूरचे सीईओ म्हणाले की, इम्रान खान यांच्या वतीने तुमचे स्वागत आहे. यावर सिद्धू म्हणाले, इम्रान खान माझा मोठा भाऊ आहे. त्याने मला खूप प्रेम दिले आहे."

करतारपूरला पोहोचल्यानंतर सिद्धू पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, "बाबा गुरू नानक यांच्या नावाने, दोन्ही देशांदरम्यान मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला पाहिजे."

"74 वर्षांत (भारत आणि पाकिस्तान दरम्यान) उभारण्यात आलेल्या भिंतींच्या खिडक्या उघडण्याची गरज आहे," असे सांगून त्यांनी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांवरही भर दिला. दोन्ही देशांमध्ये व्यापार व्हायला हवा, असे ते म्हणाले.