Gautam Adani Family : लेकीसुना, नातवंडं.... सहकुटुंब सहपरिवार 'अदानी अ‍ॅण्ड सन्स' पहिल्यांदाच सर्वांसमोर

Gautam Adani Family : जे अदानी आता संकटात सापडले आहेत त्यांच्या कुटुंबात आहे तरी कोण? तुम्हालाही पडलाय प्रश्न, तर पाहा ही माहिती... 

Updated: Feb 3, 2023, 11:11 AM IST
Gautam Adani Family : लेकीसुना, नातवंडं.... सहकुटुंब सहपरिवार 'अदानी अ‍ॅण्ड सन्स' पहिल्यांदाच सर्वांसमोर  title=
Gautam Adani Family tree brothers wife son details latest Marathi news

Gautam Adani Family Tree: देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत वर्षानुवर्षे अग्रगणी असणाऱ्या (Mukesh Ambani Family) अंबानी कुटुंबाला पिछाडत एका नावानं संपूर्ण जगाचच लक्ष वेधलं. हे नाव होतं, गौतम अदानी (Gautam Adani) यांचं. देशात आणि आशिया खंडात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या याच अदानींच्या मागे काही दिवसांपासून मात्र अडचणींची रांग लागली आहे. (hindenburg report) हिंडनबर्गच्या अहवालानंतर सुरु झालेलं हे सत्र काही केल्या त्यांची पाठ सोडत नसल्याचच पाहायला मिळत आहे. श्रीमंतांच्या यादीतूनही त्यांची घसरण झाल्यामुळं आता पुढे त्यांचं काय होणार? असाच प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. 

एकिकडे अदानी त्यांचा एफपीओ (Adani Enterprises FPO) रद्द करतात काय, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा शब्द देतात काय आणि दुसरीकडे त्यांच्या संपत्तीत घट होते काय. बरं यामध्ये एकटे गौतम अदानी नव्हे, तर त्यांचा भाऊ विनोद अदानीसुद्धा अडचणीत सापडताना दिसत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सात भावंडांसह चाळीत राहणाऱ्या या अदानी कुटुंबानं अशी उसळी मारली की आज ही मंडळी थेट खासगी विमानानं प्रवास करु लागली.  

अदांनींचा भूतकाळ... 

गुतराजमधील एका सर्वसामान्य कुटुंबात गौतम अदानी यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शालेय शिक्षण अहमदाबाद स्थित सेठ चिमनलाल नगीनदास विद्यालयात झालं. पुढे त्यांनी गुजरात विद्यापीठातून वाणिज्य (Commerce) शाखेतून पदवी शिक्षण घेतलं. पण दुसऱ्याच वर्षात त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं. 

अदानींच्या वडिलांचं नाव शांतीलाल आणि आईचं शांता बेन. त्यांच्या वडिलांचा एक लहानसा कापड उद्योग होता. असं सांगितलं जातं की अदानींचं बालपण चाळीतच गेलं. अदानींच्या सर्वात मोठ्या भावाचं नाव आहे, मनसुखभाई अदानी. इतर भावंडांची नावं विनोद, राजेश, महासुख, वसंत. तर, त्यांच्या बहिणींबाबत मात्र फारशी माहिती समोर आलेली नाही. 

...आणि अदानींनी मुंबई गाठली 

वडिलांच्या उद्योगामध्ये गौतम अदानी यांचं मन रमलं नाही आणि मग त्यांनी 17 व्या वर्षी मुंबई गाठली. इथं त्यांनी हिरे व्यापारी महिंद्रा ब्रदर्स यांच्यासोबत काम केलं. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी मुंबईतच स्वत:चा डायमंड ब्रोकरेज व्यवसाय सुरु केला आणि पहिल्याच वर्षात लाखोंची कमाई केली. (Gautam Adani business)

1981 मध्ये अदानींचा मोठा भाऊ, मनसुखभाई यांनी अहमदाबादमध्ये एक प्लास्टिक कंपनी खरेदी केली. पुढे गौतम अदानींनी यात हातमिळवणी केली आणि इथूनच जागतिक व्यापारात त्यांनी उडी घेतली. अनुभवांनी मोठं होत त्यांनी 1998 मध्ये त्यांनी अदानी एक्सपोर्ट्स लिमिटेडची सुरुवात केली. 

Gautam Adani Family tree brothers wife son details latest Marathi news

हेसुद्धा वाचा : Gautam Adani Net Worth: गौतम अदानींना आणखी एक धक्का, टॉप-20 मधूनही बाहेर; Share Market मध्ये खळबळ

 

व्यवसाय वाढत होता तसतशी श्रीमंतीही वाढत होती. सुरुवातीला स्कूटरवरून फिरणाऱ्या अदानींनी पुढे मारुती (Maruti 800), त्यानंतर लक्झरी कार आणि आता थेट खासगी विमानानं प्रवास सुरु केला. या प्रवासात त्यांना पुढे सहचारिणी अर्थात पत्नी (Priti Adani) प्रितीचीही साथ मिळाली. (Adani foundation) अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी असणाऱ्या प्रिती यांनी समाजसेवेचाही वसा उचलला. कुटुंब पुढे वाढत गेलं, अदानी यांची दोन्ही मुलं करण आणि जीत या दोघांनीही वडिलांना त्यांच्या व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली. पुढे कॉर्पोरेट क्षेत्रातील नावाजलेले वकील, सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधी अदानींची सून म्हणून या कुटुंबात आली. 

गौतम अदानी यांचा पुतण्या, भाऊ राजेश यांचा मुलगा सागरही त्यांना अदानी समुहात हातभार लावू लागला. अदानी ग्रीन एनर्जी, सोलार एनर्जीची जबाबदारी त्यानं सांभाळली. श्रीमंती आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी एकाच वेळी वाढत गेल्या. पण, आता मात्र या डोलाऱ्याला सुरुंग लागल्यामुळं परिस्थिती दिवसागणिक बिघडताना दिसत आहे.