Gas Cylinder Price: LPG ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा कितीने सिलिंडर स्वस्त?

Gas Cylinder Price Latest News: गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत  (gas cylinder price) कोणताही दिलासा मिळालेला नाही. 

Updated: Dec 1, 2022, 08:15 AM IST
Gas Cylinder Price: LPG ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा कितीने सिलिंडर स्वस्त?  title=

LPG Price Today: सध्या महागाईचा दर चढाच दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस या महागाईत होरपळा आहे. (LPG Price)  गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही दिलासा मिळालेला नाही. डिसेंबर महिन्यातही सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. म्हणजेच वाढत्या किमतीतून तुम्हाला दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही या महिन्यात एलपीजी सिलिंडरची बुक करणार असाल तर त्याआधी तुमच्या शहरात 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत किती आहे पाहा. 

IOCL ने नवीन दर केले जारी

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आज घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचवेळी, गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 115.50 रुपयांनी कमी झाल्या होत्या. गेल्या 6 वेळा 19 किलोच्या सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात होताना दिसत आहे. 

गॅस सिलिंडरची किंमत पाहा

देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे तर 1 डिसेंबर 2022 रोजी येथे घरगुती गॅस सिलिंडरचा दर 1053 रुपये आहे. याशिवाय कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे. 

केव्हा झाला होता शेवटच्यावेळी दरात बदल  

14 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 6 ऑक्टोबर रोजी बदल करण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात घरगुती एलपीजीच्या किमती 15 रुपयांनी वाढल्या होत्या. तर यापूर्वी 22 मार्च रोजी दर 50 रुपयांनी वाढले होते. 

प्रमुख शहरातील व्यावसायिक सिलिंडरची किंमत 

- दिल्ली - रु. 1744 
- मुंबई - रु. 1696
-चेन्नई - रु. 1891.50
- कोलकाता - रु. 1845.50 

Petrol and Diesel Prices : पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त

दरम्यान, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे त्रासलेल्या जनतेला आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर 14 रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 81 डॉलरवर आल्या आहेत. अमेरिकी क्रुड तेलाचा सरासरी भाव प्रति बॅरल 74 डॉलर झाला आहे.