भोपाळ : अनेक प्रयत्नानंतरही महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हबीबगंज परिसरात रेल्वे लाईनजवळून क्लासहून परत येणा-या १९ वर्षीय विद्यार्थीनीला नराधमांनी पळवलं.
त्यानंतर एका पुलाखाली तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर भोपाळमध्ये लोकांमध्ये संताप बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी धरणे-आंदोलनही करण्यात येत आहे.
लोकांच्या संतापानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. शासकिय रेल्वे पोलीस हबीबगंज स्टेशनच्या एका अधिका-यांनी सांगितले की, आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोलू बिहारी, अमर छोटू, राजेशाणि रमेश अशी त्यांची नावे आहेत. बेजबाबदारीमुळे काही पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे.
Bhopal:Congress workers protest at GRP police station ovr alleged gang-rape of a girl while she ws returning home frm coaching classes y'day pic.twitter.com/ISbbIaWlWA
— ANI (@ANI) November 3, 2017
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरला सायंकाळी महाराणा प्रताप नगरच्या कोचिंग क्लासवरून विद्यार्थीनी चालत घरी जात होती. तेव्हा काहींनी तिचं अपहरण केलं. पीडिता ही बीएससीची विद्यार्थी आहे. अपहरण केल्यानंतर आरोपींनी तरूणीला पुलाखाली नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला तिथेच सोडून फरार झाले. त्यानंतर पीडिताने पोलिसात तक्रार दाखल केली.
आरोपींनी तरूणीचा गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केल्याचे तिने सांगितले. अत्याचार केल्यानंतर तरूणी मरण पावल्याचा विचार करून तिला ते तेथेच सोडून गेले. शुद्धीवर आल्यावर ती कशीबशी घरी पोहोचली आणि कुटुंबियांना सगळी घटना सांगितली. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली.