नवरदेवानं लग्नमंडपात वधूसोबत असं काही केलं की भटजी चक्रावला, व्हिडीओ

लग्नमंडपात नवरदेवानं नेमकं काय केलं? पाहा व्हिडीओ

Updated: Jun 19, 2021, 01:45 PM IST
नवरदेवानं लग्नमंडपात वधूसोबत असं काही केलं की भटजी चक्रावला, व्हिडीओ  title=

मुंबई: लग्नाच्या मंडपात अनेक गमतीजमती घडत असतात. काही दिवसांपूर्वी नवरदेव आणि नवरी मुलगी कंटाळा आला म्हणून खेळताना तर नवरदेव आणि नवरी जांभया देतानाचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.

लग्नाच्या मंडपात मजा आणि मस्ती सुरू असते. त्यामुळे लग्न समारंभात एक वेगळीच मजा येते. या लग्न समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवरदेवानं नवऱ्यामुलीसोबत असं काही केलं की मंत्र म्हणणारा भटजीही चक्रावला आणि ओरडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@trending_wedding_couples)

नवरदेवानं वधूच्या खांद्यावर हात ठेवला होता. भटजीने हा प्रकार पाहून हात खाली घेण्यासाठी ओरडला आणि सर्वांमध्ये एकच हशा पिकला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 5,932 लोकांनी पाहिला आहे.