नवा कामगार कायदा : आठवड्याला 5 दिवसांऐवजी फक्त 4 दिवस करा काम, 3 दिवसांची सुट्टी

मोदी सरकार लवकरच नवा नियम लागू करणार 

Updated: Jun 19, 2021, 01:03 PM IST
नवा कामगार कायदा :  आठवड्याला 5 दिवसांऐवजी फक्त 4 दिवस करा काम, 3 दिवसांची सुट्टी title=

मुंबई : नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्वाची बातमी.... आता कमी तास आणि कमी दिवस काम करावं लागणार आहे. (Centre to soon implement new labour codes. Here how it can affect your salary)  लवकरच आठवड्याच्या पाच दिवसांपैकी आता फक्त चार दिवसच काम करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांना आता दोन दिवसाऐवजी तीन दिवसांची सुट्टी असणार आहे. 

देशाच्या नव्या श्रमिक कायद्यात (Labour Codes) मध्ये येणाऱ्या काळात बदल होणार आहे. तीन दिवसाची सुट्टी या कायद्यात मिळणार आहे. केंद्र सरकारने ट्रॅवलिंग अलाऊंस म्हणजे प्रवास खर्च (Travel Allowance) जमा करण्याचा कालावधी देखील वाढवला आहे. 60 दिवसांवरून हा कालावधी 180 दिवसांवर झाला आहे. हे सर्व नियम 15 जून 2021 रोजीपासून लागू होणार आहे.

मार्च 2018 मध्ये केंद्र सरकारने रिटायरमेंटवर टीएचा क्लेम कालावधी 1 वर्षांवरून कमी करून 60 दिवसांवर केला आहे. हा निर्णय अत्यंत महत्वाचा असून त्याचा ज्येष्ठांना फायदाच होणार आहे. 

पाच दिवसांऐवजी फक्त चारच दिवस कामावर जावं लागणार 

नव्या कामगार कायद्यानुसार नवे नियम तयार करण्यात आलेत. यामध्ये कंपनी आणि कर्मचारी एकत्र येऊन निर्णय घेऊ शकतात. नव्या नियमांनुसार सरकारने कामाचे तास वाढवून 12 तासाचे केले आहेत. काम करण्याचा कालावधी आठवड्याभराचा 48 तासाचा असणं आवश्यक आहे. यामुळे कामाचे दिवस कमी होऊ शकतात. 

कामाचा कालावधी 12 तास करणार 

नव्या कायद्यानुसार, कामाचा कालावाधी वाढवून 12 तासांचा केला आहे. कोडच्या ड्राफ्ट नियमांमध्ये 15 ते 30 मिनिटापेक्षा जास्त कामाला 30 मिनिटे मोजून ओव्हरटाइममध्ये सहभागी केलं आहे. या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला 5 तासाहून अधिक काळ सतत काम करण्यास परवानगी नाही. कर्मचाऱ्यांना प्रत्येक पास तासाने अर्ध्या तासाच ब्रेक आवश्यक आहे. 

पगार कमी होऊन पीएफ वाढणार 

नव्या नियमानुसार, कर्मचाऱ्याला महिन्याला हातात मिळणारा पगार हा एकूण पगारापेक्ष्या 50 टक्क्याहून अधिक असावा. जास्तकरून कर्मचारी या वेतन स्ट्रक्चरला बदलू शकतात. यावेळी टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. आणि पीएफ अमाऊंट वाढू शकतो. नवीन वेतन कोड लागू झाल्यानंतर सीटीसीमधील 50 ट्क्के बेसिक सॅलरीच्या रुपात कर्मचाऱ्यांना द्याव लागणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ आणि ग्रॅच्युटी सारख्या इतर घटकांकरता कर्मचाऱ्यांचे योगदान वाढणार आहे. 

न्यू वेज कोड लागू झाल्यानंतर बोनस, पेंशन, वाहन भत्ता, घराचे भाडे, आवास लाभ, ओव्हर टाइम सारख्या गोष्टी कमी होणार आहे. कंपनीला बेसिक सॅलरीचे 50 टक्के सोडून इतर 50 टक्के हे या गोष्टीत सामावून घ्यायचे आहेत.