सामान्यांना मोठा धक्का! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, वाचा आजचे दर

Petrol-Diesle Price: देशातील काही भागात तेलाच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर जारी करतात. आज तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या... 

Updated: Dec 6, 2022, 08:14 AM IST
सामान्यांना मोठा धक्का! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, वाचा आजचे दर   title=
Fuel Prices on 6 December 2022 Check petrol diesel rates in Delhi, Mumbai and other cities

Petrol-Diesel Price Today 6th December 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमती घसरल्यानंतरही भारतीय बाजारात तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. याचदरम्यान देशात काही ठिकाणी तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येते. देशाच्या चार महानगरांमध्ये तेलाच्या किमतीत सहा महिन्यांहून अधिक काळ बदल झालेला नाही. मात्र याचदरम्यान पेट्रोल व डिझेल (Petrol-Diesel Price in maharashtra) तेलाच्या किमतीत दर-वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समजल्यामुळे सर्वसामान्य लोकांना महागाईची चिंता वाढली आहे. यामध्ये देशातील काही भागांमध्ये ही दरवाढ करण्यात आलेली आहे.  

या भागात तेलाच्या किमतीत वाढ

- गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात आज (6 डिसेंबर 2022) सकाळी पेट्रोल 42 पैशांनी 97 रुपये 97 पैसे आणि डिझेल 39 पैशांनी 90.14 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
- लखनौमध्ये पेट्रोल 5 पैशांनी महागले असून ते 96.62 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 5 पैशांनी 89.81 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
- राजधानी पाटणामध्ये आज (6 डिसेंबर 2022) सकाळी पेट्रोलचा दर 50 पैशांनी वाढून 107.74 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेल 47 पैशांनी महागून 94.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
- गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 53 पैशांनी महागले असून ते 97.80 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 51 पैशांनी 90.24 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

वाचा: मेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? Mark Zuckerberg कडून धमकी! 

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.76 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.29 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.09 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.62 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा

पेट्रोल डिझेलचे दर आपण SMS द्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 SMS पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.