पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त, पाहा काय आहेत आजचे दर

खूशखबर!

Updated: Jun 7, 2018, 10:45 AM IST
पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त, पाहा काय आहेत आजचे दर title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या बदलांचा परिणाम भारतीय बाजारात पहायला मिळत आहे. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाल्याचं पहायला मिळालं. इंधन दर कपातीचा हा सलग ९वां दिवस आहे. इंधन दरात झालेल्या कपातीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी पेट्रोलच्या दरात ९ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ८ पैशांनी कपात झाली आहे. यानंतर देशातील चार महानगरांपैकी दिल्लीत पेट्रोलचा दर ७७.६३ रुपये प्रति लीटर, मुंबईत ८५.४५ रुपये प्रति लीटर झाला आहे. तर राजधानी दिल्लीत डिझेलचा दर ६८.७३ रुपये,  मुंबईत ७३.१७ रुपये प्रति लीटर झाला आहे.

९ पैशांनी पेट्रोल स्वस्त

शहर किंमत
दिल्ली ७७ रुपये ६३ पैसे
कोलकाता ८० रुपये २८ पैसे
मुंबई  ८५ रुपये ४५ पैसे
चेन्नई ८० रुपये ५९ पैसे

डिझेल ७ पैशांनी स्वस्त 

शहर किंमत
दिल्ली ६८ रुपये ७३ पैसे
कोलकाता ७१ रुपये २७ पैसे
मुंबई ७३ रुपये १६ पैसे
चेन्नई ७२ रुपये ५५ पैसे

किती स्वस्त झालं पेट्रोल?

गेल्या ९ दिवसांचा विचार केला तर दिल्लीत एक लीटर पेट्रोलच्या दरात ८० पैशांनी कपात झाली आहे. २९ मे २०१८ रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर ७८.४३ रुपये प्रति लीटर होता. यानंतर पेट्रोलच्या दरात काही पैशांनी घट झाली. तर, डिझेल ५८ पैशांनी स्वस्त झालं. 

६ डॉलर प्रति बॅरल झाली घट

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या १० महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीत ६ डॉलर प्रति बॅरलहून अधिक घट झाली आहे. बुधवारी क्रुड तेल १.६ टक्क्यांनी घट होत ७४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. कच्चा तेलाच्या किमतीत सलग होणाऱ्या घसरणीचा फायदा स्थानिक बाजारात होत आहे.