सॅटेलाईट इमेजमुळं बिंग फुटलं! LAC नजीक चीनचा थटथयाट अखेर जगासमोर

India China Border Dispute: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांतील तणाव काही केल्या मिटण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच नव्यानं समोर आलेल्या छायाचित्रांमुळे या तणावात आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत.   

सायली पाटील | Updated: Jun 1, 2023, 11:26 AM IST
सॅटेलाईट इमेजमुळं बिंग फुटलं! LAC नजीक चीनचा थटथयाट अखेर जगासमोर  title=
fresh satallite images revealed chinda increasing strength near LAC latest updates

India China Border Dispute: सातत्यानं भारतीय सीमाभागात कुरापती करणाऱ्या चीननं पुन्हा एकदा नापाक मनसुबे सत्यात उतरवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा भारत-चीन Line Of Actual Control अर्थात LAC नजीक हे राष्ट्र आपली ताकद वाढवताना दिसत आहे. नव्यानं समोर आलेल्या satellite image मुळे या देशाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. 

2020 मध्ये एलएसीनजीकच्या भागात सैनिकी कारवाया झाल्यानंतर चीनकडून तातडीनं त्यांचे लाँच पॅड, हवाई तळ, शस्त्रास्त्रांची ठिकाणं यावर अधिक लक्ष पुरवण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे, तर रस्ते, पूल यांच्या रुंदीकरणाची कामंही हाती घेण्यात आली. (fresh satallite images revealed chinda increasing strength near LAC latest updates )

चीननं तयार केलाय नवा रनवे 

HT नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार न्गारी गुनसा आणि ल्हासा या भागांतील उपग्रह छायाचित्रांतून चीननं इथं एक नवा रनवे तयार केल्याचं कळत आहे. शिवाय लढाऊ विमानं ठेवण्यासाठी एक नवा तळ, मिलिटरी ऑपरेशन बिल्डींग असं बांधकाम मोठ्या प्रमाणात केल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. 

हेसुद्धा पाहा : घातक! खडतर प्रशिक्षणापासून काचेचा तुकडा चावून गिळेपर्यंत; असे घडतात Special Forces चे Commando

 

भारताच्या दृष्टीनं चीनच्या या कुरापती चिंतेत भर टाकणाऱ्या आहेत. कारण, भारताविरोधी कारवायांसाठी इथून बऱ्याचदा सूत्र हलल्याची माहिती मिळते. मुख्य म्हणजे 2020 मध्ये गलवानच्या खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर या भागावर भारतीय संरक्षण विभागही नजर ठेवून आहे. या संघर्षामध्ये काही सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. मागील 45 वर्षांमध्ये हा असा एकमेव संघर्ष ठरला होता जिथं जवान प्राणाला मुकले होते. 

चीनममध्ये नेमकं काय सुरुये? 

दक्षिण-पश्चिमी झिंजियांग प्रांतातील होतानचा हवाई तळ भारताच्या लडाखची (Ladakh) राजधानी लेहपासून अवघ्या 400 किमीवर अगदी सरळ रेषेत स्थिरावला आहे. 2020 मध्ये होताननजीक कोणतंही बांधकाम पाहिलं गेलं नव्हं. पण, 2023 च्या मे महिन्यात समोर आलेल्या माहितीतून इथं रनवेसह विमानांसाठीचे तळ आणि तत्सम इतर बांधकामं झाल्याचं लक्षात येत आहे. 

तिथे पँगाँगच्या जलाशयापासून सरळ रेषेत 200 किमीवर स्थिरावलेल्या एअरफिल्डवर 2010 मध्ये परिचालन सुरु होऊ 2017 मध्ये डोकलाम येथे उदभवलेल्या तणावग्रस्त परिस्थितीनंतर त्याचा विस्तार करण्यात आला. तर, तवांगपासून सरळ रेषेत 250 किमी अंतरावर असणाऱ्या ल्हासा हवाई तळावर एकाएकी किमान 30 नवे विमानतळ आणि सहायक इमारतींचा ताफा नरजेत पडत आहे. चीननं केलेली ही बांधकामं पाहता देश नेमकी कोणती तयारी करतोय हाच प्रश्न उपस्थित होत आहे.