नवी दिल्ली : काही देशी आणि ग्लोबल कंपन्यांना मागे टाकत देशाच्या एफएमसीजी कंपन्यांमध्ये पतंजलीने एफएमसीजी कंपन्यांत आपले स्थान निर्माण केले आहे. त्या पुढे जात पतंजली कंपनी ग्लोबल ब्रॅंड बनण्याच्या तयारीत आहे. योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला एक मोठी ऑफर मिळाली आहे. आता ही ऑफर प्राथमिक स्तरात आहे. मात्र या ऑफरनंतर पतंजली एक ग्लोबल ब्रॅंड म्हणून नावारूपाला येईल. फ्रान्सच्या लग्जरी ग्रुप एलवीएमएचने पतंजली आयुर्वेदात भागीदारी घेण्याची इच्छा वर्तवली आहे. यासाठी ते ५० कोटी डॉलर देण्यास तयार आहेत.
एलव्हीएमएच कंपनीनुसार, पतंजली मॉडलमध्ये मल्टीनॅशनल आणि फॉरेन इंव्हेस्टमेंटची इच्छा नसून कंपनीसोबत बिजनेस करण्याची इच्छा आहे. एलव्हीएमएचसोबत कंपनी आपले प्रॉडक्टस अमेरिका, जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये विकेल. त्याचबरोबर पतंजली एक ग्लोबल कंपनी होण्यास मदत होईल.
मीडिया रिपोर्टनुसार, पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की, ते कंपनीचा काही भाग विकणार नाही. मात्र पतंजली ५००० कोटींचे कर्ज घेऊ इच्छित आहे. कंपनीला कमी दरात कर्ज मिळण्याची आशा आहे.
French luxury group eyes investing over Rs 3K cr in Patanjali
Read @ANI Story | https://t.co/mfg0gX0XUK pic.twitter.com/YSOjXH7whn
— ANI Digital (@ani_digital) January 11, 2018
पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण म्हणाले की, आपल्या अटींवर आर्थिक मदत घेण्यासाठी मी तयार आहे. यासाठी ते इक्विटी किंवा शेअर विकून पैसे घेणार नाहीत. त्याचबरोबर ते म्हणाले की, देशाच्या विकासाठी परदेशी टेक्निकचा वापर केला जातो. अशात जर ते ते आमच्या अटी स्विकारण्यास तयार असतील तर आम्हीही तयार आहोत. फ्रेंच कंपनीनुसार, पतंजली कंपनीची किंमत आता ५ अरब डॉलर आहे. ते पतंजलीला ग्लोबल ब्रॅंड बनवण्यास मदत करतील.