Free OTT Access : टीव्हीवर मनोरंजन बघने हे प्रत्येकाला प्रत्येकवेळी शक्य होत नसतं. म्हणूनच आता अनेकजण मनोरंजन आणि चांगला कन्टेट पाहण्यासाठी अनेक लोक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे जात आहेत. परंतु यासाठी Hotstar, Netflix-Amazon Prime सारखा ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी त्याचं सब्सक्रिप्शन घेण्याची गरज भासते.
पण सब्सक्रिप्शनसाठी देखील लोकांना पैसे भरावे लागतात. म्हणेज तुम्हाला ते मोबाईल पॅक प्रमाणे एक महिना, सहा महिने किंवा वर्षभरासाठी त्याचं सदसत्व घ्यावं लागतं. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आता तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये पाहाता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला Hotstar, Netflix किंवा Amazon Prime वरील कन्टेन्ट किंवा सिनेमा पाहण्यासाठी आता वेगळे पैसे देण्याची गरज नाही. आता हे कसं शक्य आहे? आणि तुम्हाला ते कसं मिळवता येईल याबद्दल माहिती करुन घ्या.
संपूर्ण देशभरात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. परंतु, ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन (OTT platform subscription) महाग असल्यामुळे प्रत्येकालाच ते वापरता येत नाही. अशातच तुम्हाला Netflix-Amazon Prime Video-Disney+Hotstar एक वर्षासाठी मोफत मिळू शकते. म्हणजे तुम्ही विनामूल्य हे प्लॅटफॉर्म (OTT platform) वापरू शकता.
असे मिळवा मोफत सब्सक्रिप्शन
या OTT प्लॅटफॉर्मचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळवण्यासाठी, तुम्ही Jio वापरकर्ता (Jio user) असणे आवश्यक आहे. वास्तविक, जर तुम्हाला सदस्यत्व शुल्क न भरता या सदस्यत्वांचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला कंपनीच्या (Jio) पोस्टपेड प्लॅनचे उत्तम OTT फायदे रिचार्ज करावे लागतील. चला सर्वोत्तम पर्यायांवर एक नजर टाकूया.
अवघ्या 399 रुपयांत हे काम होणार आहे
जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये (Jio Recharge Plan) तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी 75GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. ही योजना Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar च्या एका वर्षाच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येते.
वाचा : तुमचं Aadhaar Card सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितली सोपी पद्धत
हे दोन प्लॅन 800 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असतील
पहिल्या प्लॅनची किंमत 599 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 100GB इंटरनेट, 100 दैनिक एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.
दुसऱ्या प्लॅनची किंमत 799 रुपये आहे. या प्लानमध्ये 150GB डेटा आणि 200GB रोलओव्हर डेटा दिला जात आहे. हा एक फॅमिली प्लॅन आहे ज्यामध्ये दोन अतिरिक्त सिम कार्ड, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि अमर्यादित एसएमएस दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.
सर्वात महाग आणि सर्वात फायदेशीर पर्याय
999 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये 200GB हायस्पीड डेटा, 500GB रोलओव्हर डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा आणि तीन सिम कार्ड दिले जात आहेत. हे प्लॅन Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar च्या सदस्यत्वासह देखील येतात.