Dog Attack: 3 भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले...

Stray Dog Attack: तेवढ्यात सोसायटीतील तीन मोकाट कुत्र्यांनी निष्पाप जीवावर हल्ला केला आणि...

Updated: Oct 18, 2022, 04:22 PM IST

Noida Dog Attack : एक धक्कादायक बातमी (Shocking news) समोर आली आहे. कुत्र्यांचा हल्ल्यात (Dog Attack) चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा (Noida) सेक्टर 39 मधील लोटस बुलेवर्ड सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. रस्त्यावरील कुत्र्याने चिमुकल्याचा चावा घेतला होता या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र 8 महिन्यांच्या चिमुरड्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 

नेमकं काय झालं? 

मिळालेल्या माहितीनुसार या चिमुकल्याचे आई-वडील मजुर असून सोसायटीच्या प्रांगणात ते या चिमुकल्याला ठेवून काम करत होते. तेवढ्यात सोसायटीतील तीन मोकाट कुत्र्यांनी निष्पाप जीवावर हल्ला केला. या कुत्र्यांचा हल्ला इतक्या भयानक होता की, त्या चिमुरड्याचे आतडे बाहेर आले होते. (dog attack noida 8 months old kid died nmp)

परिसरात भीतीदायक वातावरण

सोसायटीच्या अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनचे (एओए) उपाध्यक्ष धरमवीर यादव म्हणाले की, सोसायटीतील लोक कुत्र्यांमुळे हैराण झाले आहेत. या समस्येवर अजून तोडगा निघू शकला नाही. AOA चे उपाध्यक्ष म्हणाले, “अनेकदा नोएडा प्राधिकरणाकडे बेकायदेशीर कुत्र्यांबाबत तक्रारी केल्या गेल्या आहेत, परंतु प्राधिकरणाचे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. ते म्हणाले की, कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ज्या प्रकारे निष्पापांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरातील मुलं आणि महिला घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. काही दिवसांपूर्वी येथे उपस्थित कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना परत आणून येथे सोडण्यात आले, त्यामुळे समस्या आणखी वाढली.