शौचालयात चार भांडे बिना पार्टीशनचे, नेटकऱ्यांना आठवली 'पंचायत' वेब सीरीज!

स्वच्छतागृहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी यावरून प्रशासनाच्या कामावर सडकून टीका केली आहे.

Updated: Dec 30, 2022, 09:24 PM IST
शौचालयात चार भांडे बिना पार्टीशनचे, नेटकऱ्यांना आठवली 'पंचायत' वेब सीरीज! title=

Viral News : उघड्यावर शौच केल्याने रोगराई पसरते यासाठी देशभरात सरकार जनजागृती करताना दिसतं. यासाठी सरकार अनेक योजना आणतं, मात्र उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनचे बारा वाजलेले दिसून आलं आहे. एका ठिकाणी स्वच्छतागृहाची चार भांडी बसवण्यात आली आहेत. मात्र पार्टिशनच केलं नसल्याने नेटकऱ्यांनी हे सर्व पाहून संताप व्यक्त केला आहे. (four toilet seats put together without partition viral photo latest marathi news)

धनसा गावात हे बांधण्यात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आलं आहे. या स्वच्छतागृहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी यावरून प्रशासनाच्या कामावर सडकून टीका केली आहे. थक्क करणारी बाब म्हणजे चार शौचाचे भांडे बसवण्यात आली आहेत मात्र पार्टिशनच केलेलं नाही. 

सोशल मीडियावर या स्वच्छतागृहाचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर अधिकाऱ्यांची झोप उडाली असून आता ते डागडुजीच्या कामाला लागले आहेत. मुख्य विकास अधिकारी राजेश प्रजापती यांनी सांगितलं की, दोषींवर कारवाई करण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे सरकारी कामांच्या दर्जावरून अनेकवेळा प्रशासनाला धारेवर धरलं जातं. मात्र उत्तर प्रदेशमधील स्वच्छतागृहाचे फोटो पाहून आता हद्दच झाली म्हणावी लागेल.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, फक्त पार्टीशनच नाहीतर दरवाजेही बसवलेले नाहीत. नेटकऱ्यांना हा फोटो पाहून पंचायत वेब सीरीजची आठवण झाली आहे.