नवी दिल्ली : तर रिलायन्स, टिसीएस, एचयूएल, मारुती, एचडीएफसी आणि ओनजीसीने कमावले पैसे
एचडीएफसी बॅँक आणि आयटीसी या शेअरबाजारातील दोन बड्या कंपन्यांना शुक्रवारी बाजारात मोठाच फटका बसला. त्यांच्या बाजारातील भाग भांडवलाला मोठंच नुकसान झालंय. त्याबरोबरच इन्फोसिस आणि एसबीआय या दोन कंपन्यांनालसुद्धा मोठा फटका बसला.
त्याउलट रिलायन्स, टिसीएस, एचयूएल, मारुती, एचडीएफसी आणि ओनजीसीचे भाग भांडवल चांगलच वाढलं. परंतु या सर्वांनी एकत्रितपणे कमावलेल्या पैशांपेक्षा (19,739.62 कोटी) एचडीएफसी बॅँक आणि आयटीसी या दोघांनी एकत्रितपणे गमावलेलं भाग भांडवल (21,319 कोटी रुपये) जास्त होतं.
सध्या टॉप 10 कंपन्यांची यादीत रिलायन्स क्रमांक एकवर आहे तर पुढील यादी क्रमांक दोन ते दहा अशी आहे, टिसीएस, एचडीएफसी बॅँक, आयटीसी, एचयूएल, मारुती, एचडीएफसी, एसबीआय, ओनजीसी आणि इन्फोसिस.