हॉलिवूड किंवा बॉलिवूड स्टार नव्हे; हे आहेत विश्वविख्यात उद्योपती

ओखळलं का यांना? 

Updated: Jan 26, 2020, 08:43 AM IST
हॉलिवूड किंवा बॉलिवूड स्टार नव्हे; हे आहेत विश्वविख्यात उद्योपती    title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या पिढिशी एक खास नातं तयार करण्याकडे अनेकांचा कल असतो. वयाची मर्यादा नसणाऱ्या या माध्यमाचा वापर करण्यामध्ये तरुणाई जितकी पुढे आहे, तितकेच अनेक ज्येष्ठ आणि दिग्गजही या माध्यमात आघाडीवर आहेत. यातीलच एक नाव म्हणजे टाटा उद्योगसमूहाचे निवृत्त अध्यक्ष रतन टाटा Rata Tata. 

एक उद्योगपती, यशस्वी वरिष्ठ अधिकारी, उद्योग जगताला जगलेला माणूस आणि तरुणाईच्या मनात घर करणारा चेहरा अशी रतन टाटा यांची ओळख. याच रतन टाटांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. टाटा यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमुळे अरेच्चा....! अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. 

#Throwback या ट्रेंडचा संदर्भ देत टाटा यांनी पोस्ट केलेला फोटो पाहता प्रथमदर्शनी हा कोणा एका हॉलिवूड किंवा बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो असल्याचा भास होतो. टाटा यांच्या तरुणाईच्या दिवसांमधील हा फोटो पाहता त्यावर अनेकांनी विशेष म्हणजे कित्येक तरुणींनीही कमेंट्स केल्या आहेत. पोस्ट केल्याच्या काही तासांनतर या फोटोवर लाखोच्या संख्येने लाईक्स आणि हजारोच्या संख्येने कमेंट्स येण्यास सुरुवात झाली. 

८२ वर्षीय रतन टाटा यांनी ही फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी हा फोटो काल पोस्ट करणार होतो. पण, त्यानंतर मला Throwbacksविषयी सांगण्यात आलं आणि त्यांच्या गुरुवारशी असणाऱ्या संपर्काविषयीही. तर, मग हा पाहा लॉस एंजेलिसमध्ये असतानाचा हा फोटो. मी अतिशय आनंदात भारतात परण्याच्या काही दिवसांपूर्वीचाच हा फोटो.'

सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करण्यात आल्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या. ज्यामध्ये टाटा यांचा हा फोटो नेमका कधीचा याविषयीही काही माहिती समोर आली.  १९६२ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये Jones and Emmonsसोबत ते काम करत असतानाचा हा फोटो असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच वर्षी रतन टाटा यांनी B.Archची पदवी घेतली होती.