आता ऑफिसला जाण्याचे टेन्शन नको, Uberची नवीन सेवा, जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Uber Corporate Shuttle : कार्यालयात जाणाऱ्यांसाठी उबरने (Uber) नवीन सेवा सुरू केली आहे.  

Updated: Sep 16, 2021, 09:30 AM IST
आता ऑफिसला जाण्याचे टेन्शन नको, Uberची नवीन सेवा, जाणून घ्या कसा मिळेल लाभ  title=

मुंबई : Uber Corporate Shuttle : कार्यालयात जाणाऱ्यांसाठी उबरने (Uber) नवीन सेवा सुरू केली आहे. ही सेवा दिल्ली, मुंबई, कोलकातासह सात शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे. कोरोना महामारीचा उद्रेक थोडा कमी झाला आहे. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत, ऑनलाइन टॅक्स एग्रीगेटन Uberने कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष कॉर्पोरेट शटल सेवा सुरू केली आहे. ज्यामध्ये ते कर्मचाऱ्यांना घरातून कार्यालय आणि कार्यालयातून घरी सोडण्यासाठी ही सुविधा देईल.

उबेरची विशेष कॉर्पोरेट शटल सेवा

उबेरचे म्हणणे आहे की, या विशेष टॅक्सी स्वच्छ आणि पूर्णपणे सुरक्षित असतील. ही सेवा आतापर्यंत सात शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे, ज्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, पुणे आणि बंगळुरू यांचा समावेश आहे. कॉर्पोरेट शटल ही customized commute service आहे. जी उबेर इंडिया विविध कंपन्यांना देत आहे. गाडीमध्ये 10-50 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे.

कंपन्यांना फायदेशीर सेवा

विश्वसनीय, सुरक्षित आणि किफायतशीर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी उबेरच्या मुख्य तंत्रज्ञानाचा वापर करून, ही सेवा कंपन्यांना त्यांचे सुरक्षित ध्येय साध्य करण्यात मदत करते, ज्यामुळे शहरांना त्यांचे ध्येय गाठण्यास मदत होते, असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गर्दी कमी होते, प्रदूषण कमी होते आणि कार्यालय पार्किंगची जागा मोकळी राहण्यास मदत होत आहे.

सुरक्षेला प्रथम प्राधान्य

सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य आहे. त्यापेक्षा काहीही नाही. उबेरकडून सांगण्यात आले की, सेवेमध्ये सुरक्षा उपायांचा संपूर्ण संच समाविष्ट आहे. ज्यात गो ऑनलाइन चेकलिस्ट, रायडर्स आणि ड्रायव्हर्स दोघांसाठी अनिवार्य मास्क पॉलिसी, ड्रायव्हर्ससाठी प्री-ट्रिप मास्क व्हेरिफिकेशन सेल्फी आणि SOPमध्ये ड्रायव्हरचे अनिवार्य शिक्षण समाविष्ट आहे.

'उबेर बदलत्या गरजा पूर्ण करेल'

उबेर कॉर्पोरेट शटलच्या लॉन्चनंतर, भारत आणि दक्षिण आशियातील उबेर फॉर बिझनेसचे प्रमुख अभिनव मिट्टू म्हणाले, “उबेरमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. उबेर कॉर्पोरेट शटल कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रथम ठेवण्यास मदत करते. ट्रॅफिक जाम, पार्किंग आणि कारच्या देखभाल खर्चाचा ताण न घेता ते सुरक्षितपणे कामावर येतात.

कर्मचाऱ्यांना आपल्या गाडीने सोडणे सोपे झाले आहे. ही सेवा आपल्या शहरांमधील गर्दी, प्रदूषण कमी करू शकते, असे ते म्हणाले. 20 महिन्यांनंतर भारताला सुरक्षितपणे कामावर परतण्यास मदत करणे हा सन्मान असणार आहे.

उबेरच्या निवेदनात म्हटले आहे की, उच्च क्षमतेरची वाहने प्रथमच भारतात सुरू होत आहेत. विशेषतः भारतातील कार्यालय आणि इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये येणाऱ्या आव्हानांना डोळ्यासमोर ठेवून उबेर शटल सेवा सुरु केली गेली आहे.