Zomatoची घोषणा, 17 सप्टेंबरपासून 'ही' सेवा करणार बंद...जाणून घ्या या मागील खरं कारण

तुम्हाला यावरुन फूड ऑर्डर केल्यावर खूप साऱ्या ऑफर्सचा लाभ देखील घेता येतो.

Updated: Sep 13, 2021, 03:30 PM IST
Zomatoची घोषणा, 17 सप्टेंबरपासून 'ही' सेवा करणार बंद...जाणून घ्या या मागील खरं कारण title=

मुंबई : ऑनलाईन फूड डीलिव्हरी फर्म झोमॅटोची सध्या ग्राहकांमध्ये खूप चर्चा आहे. हे खूप प्रसिद्ध फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही भागातून तुमच्या आवडीचे जेवण किंवा कोणतेही फूड मागवू शकता. तसेच तुम्हाला यावरुन फूड ऑर्डर केल्यावर खूप साऱ्या ऑफर्सचा लाभ देखील घेता येतो.

आता फूड डीलिव्हरी फर्म झोमॅटो पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, ते त्याच्या एका सेवेमुळे. खरंतर झोमॅटो आता किराणा डीलिव्हरी सेवेतून (Grocery Delivery Service)  बाहेर पडले आहे. आता तुम्हाला झोमॅटोच्या अ‍ॅपवर किराणा डीलिव्हरी सेवा मिळणार नाही.

फूड टेक प्लॅटफॉर्मने आपली नुकतीच सुरू केलेली किराणा डीलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला कारण ऑर्डर पूर्ण करण्यात त्यांना खूप वेळ लागत आहे, तसेच ग्राहकांचा कमकुवत प्रतिसाद आणि प्रतिस्पर्ध्यांसोबतची वाढती स्पर्धा पाहाता कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

झोमॅटोच्या प्रवक्त्याने मनीकंट्रोलवरील किराणा डीलिव्हरी सेवा बंद केल्याची पुष्टी केली आहे.

कोणत्याही प्रकारचे किराणा वितरण चालवण्याची कोणतीही योजना नाही

झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमचे ग्रोसरी पायलट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर इतर कोणत्याही प्रकारचा किराणा डीलिव्हरी सेवा चालवण्याची योजना नाही. कंपनीने अलीकडेच 100 मिलियन डॉलर (745 कोटी रुपये) गुंतवणूकीसह ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म ग्रोफर्समधील काही भाग खरेदी केला आहे.

कंपनीचे सीएफओ अक्षत गोयल म्हणाले होते की, झोमॅटोने या नवीन क्षेत्रात अधिक अनुभव मिळवण्याच्या उद्देशाने आणि व्यवसायासाठी नियोजन आणि धोरण आखण्याच्या उद्देशाने ग्रॉफर्समध्ये शेअर्स खरेदी केला आहे. ते म्हणाले की, आम्ही लवकरच झोमॅटो अ‍ॅपवर किराणा मालाची ऑनलाईन विक्री करण्याची सेवा सुरू करू आणि यासह आम्ही या जागेत पाऊल टाकू आणि आपण किती वेगाने वाढू शकतो हे पाहू.

17 सप्टेंबरपासून पायलट किराणा डीलिव्हरी सेवा बंद

झोमॅटोने 11 सप्टेंबर 2021 रोजी त्याच्या ग्रॉसरी पार्टनर्सना पाठविलेल्या मेलमध्ये असे म्हटले आहे की, त्यांनी 17 सप्टेंबरपासून पायलट किराणा डीलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने निवडक बाजारांमध्ये किराणा सेवा पायलट सुरू केली होती. याअंतर्गत, ग्राहकांना 45 मिनिटांच्या आत किराणा वितरण देण्यात येत होते.