तुम्हालाही दीपिकासारखं स्टायलिश दिसायचं का..फक्त करा हे काम

अतिशय स्टायलिश दिसण्यासोबतच हा लुक कम्फर्टेबल लुक देखील देईल

Updated: Aug 1, 2022, 07:58 PM IST
तुम्हालाही दीपिकासारखं स्टायलिश दिसायचं का..फक्त करा हे काम  title=

DEEPIKA PADUKON LOOK : सेलिब्रिटीसारखं सुंदर आणि स्टायलिश दिसायला सर्वानाच आवडेल पण बऱ्याचदा आपण चुकीचं कॉम्बिनेशन ट्राय करतो आणि छान  दिसण्याऐवजी आपला लुक वेगळा दिसू लागतो जर तुमच्याकडे ब्लॅक हाय वेस्ट पॅन्ट असेल तर तुम्ही सुद्धा दीपिका प्रमाणे स्टायलिश दिसू शकता यासाठी तुम्हाला इतकंच करायचंय काही फॅशन टिप्स फॉलो करायच्या आहेत ज्या स्वतः दीपिका फॉलो करते 

चला जाणून घेऊया दीपिका कशा प्रकारे  कॅरी करते तिचा लुक 

क्रॉपटॉप सोबत

 
जर तुम्ही पार्टीला जात असाल आणि तुम्हाला वेगळा लूक हवा असेल, तर तुम्ही क्रॉप टॉपसोबत ब्लॅक हाय वेस्ट पॅन्ट मॅच करू शकता. हा लूक अधिक स्टायलिश करण्यासाठी, स्टेटमेंट नेकलेस आणि केसांचा  हाय बन बनवण्यास विसरू नका. सोबतच व्हाईट रंगाचे स्नीकर्स तुमचा लुक पूर्ण करतील 

स्ट्राइप टॉप 

दीपिका पदुकोण प्रमाणे, तुम्ही हाय वेस्ट पॅंटला स्ट्रीप टॉपसह मॅच करू शकता. अतिशय स्टायलिश दिसण्यासोबतच हा लुक कम्फर्टेबल लुक देखील देईल. हा लुक तुम्ही कॅज्युअल आउटिंगसाठी  पार्टी तसेच मुव्हीसाठी ट्राय करू शकता 

लूज फिटिंग टॉप


आजकाल ओव्हरसाईज कपडे प्रचंड  ट्रेंडमध्ये  आहेत,जर तुम्हाला ट्रेंडी लूक हवा असेल तर ओव्हरसाईज टॉप किंवा टँक टॉपसोबत हाय वेस्ट पॅन्ट मॅच करून स्टायलिश लुक मिळवू शकता.

ब्लॅक हाय वेस्ट पॅंट कोणत्याही रंगाच्या टॉप सोबत तुम्ही मॅच करू शकता इतकंच नाही तर यावर सगळ्या स्टाईलचे बूट हिल्स शूज उत्तम दिसतात.मात्र तुम्हाला अगदी दीपिका सारखाच लुक हवाय तर यासोबत तुम्ही मेकअप कडे पण तितकचं लक्ष द्या