नवी दिल्ली: देशभरात ड्रोन उडवण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आलीये.. नागरी उड्डाण मंत्रालयानं यासंदर्भात एक नियमावली तयार केलीये.. १ डिसेंबरपासून ही नियमावली लागू होणार आहे. परंतु, ड्रोनच्या वापरावर सरकारकडून काही अटीही घालण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ड्रोन उडवणाऱ्यांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाइल अॅपच्या माध्यमातून परवानगी मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
देशभरात ड्रोन उडवण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयानं यासंदर्भात एक नियमावली तयार केली असून, ती 1 डिसेंबर 2018पासून लागू होणार आहे. परंतु ड्रोनच्या वापरावर सरकारकडून काही अटीही घालण्यात आल्या आहेत.
नागरी उड्डाण मंत्रालयाकडून रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम(आरपीएएस)च्या वापरासंदर्भात ही नियमावली बनवली आहे. या नियमावलीनुसार एअरस्पेसला तीन नियमांमध्ये विभागण्यात आलं आहे. पहिल्या रेड झोन(रेड झोनमध्ये तुम्हाला उड्डाणाची परवानगी नसते.)मध्ये तुम्ही एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय बॉर्डर, दिल्लीचा विजय चौक, राज्यांचे सचिवालय आणि सुरक्षेसंदर्भातील अन्य स्थळांवर ड्रोन उडवू शकत नाही. यल्लो झोन(नियंत्रित वायू क्षेत्र) आणि ग्रीन झोन(ड्रोन उडवण्याची परवानगी)मध्ये ड्रोन उडवण्याची परवानगी आहे. तुम्ही ड्रोनचा वापर ४०० फुटांच्या उंचीपर्यंत करू शकता, असंही नियमावलीतून स्पष्ट करण्यात आलं आहे.
ड्रोनबाबत पाच श्रेणी ठरवण्यात आल्या आहेत. ज्यात नॅनो ड्रोन-२५० ग्रॅम, मायक्रो ड्रोन- २५० ग्रॅमपासून २ किलो, मिनी ड्रोन- दोन किलोपासून २५ किलो, स्मॉल ड्रोन- २५ किलोपासून १५० किलो आणि लार्ज ड्रोन- १५० किलोंचा सहभाग आहे. विशेष म्हणजे ड्रोन उडवणा-यांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाइल अॅपच्या माध्यमातून परवानगी मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.