Flipkart Amazon Sale : सध्या ऑनलाईन शॉपिंग चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेक जण दुकानात जाऊन खरदे करण्यापेक्षा ऑनलाईनच शॉपिग करतात. कपड्यांपासून अगदी मोबाईल, लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रनिक वस्तु देखील ऑनलाईन ऑर्डर केल्या जातात. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी एक गूड न्यूज आहे. Flipkart आणि Amazon या बड्या ई कॉमर्स साईटवर सध्या बंपर सेल सुरु आहे. या सेल मध्ये Apple मॅकबुक फक्त 56 हजारात मिळत आहे. तर, स्मार्टवॉचवर देखील 90% तगडा डिस्काउंट मिळत आहे. सर्व ऑफर जाणून घेण्यासाठी बातमी पूर्ण वाचा...
फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या सेलला 1 मिलियन पेक्षा अधिक सर्च मिळाले आहेत. गुगल ट्रेंड्सनुसार, मागील 24 तासांत 5 लाखांहून अधिक सर्च करण्यात आले आहेत. गुगल ट्रेंड्सनुसार, फ्लिपकार्टच्या विक्रीत सुमारे 75 टक्के आणि ॲमेझॉनच्या विक्रीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
फ्लिपकार्ट ई-कॉमर्स कंपनीचा फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 27 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, प्लस मेंबर असणाऱ्यांसाठी 26 सप्टेंबरपासून या सेलचा लाभ घेता येत आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घरगुती उत्पादनांव्यतिरिक्त, स्मार्टफोनपासून स्मार्ट टीव्हीपर्यंत सर्व वस्तुंवर जबरदस्त ऑफर आणि चांगला डिस्काऊंट मिळत आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अनेक विशेष ऑफर, कॅशबॅक आणि क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील एक्स्ट्रा ऑफर्स मिळत आहेत. 'फ्लिपकार्ट पे लेटर' ऑफरमध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर पैसे नंतर भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 26 सप्टेंबरपासून आहे. या फ्लॅगशिप सेलमध्ये स्मार्टफोनपासून अनेक गृहोपयोगी वस्तूंपर्यंत इतर अनेक आवश्यक वस्तूंवर चांगली सूट मिळत आहे. Amazon प्लॅटफॉर्मनुसार, अनेक मध्यम आणि लहान विक्रेते या प्लॅटफॉर्मवर विक्रीदरम्यान 9500 नवीन प्रॉडक्ट लाँच करत आहेत.