DGCA New Guidelines : दिल्लीत धुक्यामुळे विमानसेवेला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल देखील झाले. काही फ्लाईट रद्द कराव्या लागल्या तर 600 हून अधिक फ्लाईटच्या उड्डाणाला उशीर झाला. अशातच आता काही प्रवाशांनी विमानतळावरच गोंधळ घातल्याने केंद्रीय मंत्र्याला या प्रकरणात लक्ष घालावं लागलं. अशातच आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (DGCA) प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसओपी जारी केली (New SOP Airlines) आहे. याअंतर्गत आता विमान उड्डाणास उशिर झाला तर प्रवाशांच्या गैरसोयीबाबत जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणते नियम जारी करण्यात आलेत पाहुया...
DGCA च्या नव्या SOP कोणत्या?
एअरलाइन्सना त्यांच्या फ्लाइटच्या विलंबाबाबत अचूक रिअल-टाइम माहिती शेअर करावी लागणार आहे. याद्वारे ती माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये. त्याचबरोबर एअरलाईन्सची वेबसाईट देखील तयार करावी लागणार आहे. एवढंच नाही तर प्रवाशांना एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल. जर विमानतळावर वाट पहावी लागणार असेल तर त्याची माहिती तात्काळ प्रवाशांना देण्यात येईल. एअरलाईन कर्मचाऱ्यांनी योग्यरित्या संवाद साधणे आणि कोणत्याही कारणास्तव होणारी माहिती प्रवाशांना देणे वाहक कंपनीला बंधनकारक असणार आहे.
नैसर्गिक आपत्ती, गृहयुद्ध, राजकीय अस्थिरता, सुरक्षा जोखीम आणि संप अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांना भरपाई देण्यास एअरलाइन्स जबाबदार नसतात. मात्र, प्रतिकुल हवामान लक्षात घेऊन विमान कंपनी उड्डाण अधिच रद्द करू शकणार आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तीन तासहून अधिक विमानास उशिर होणार असेल तर उड्डाण रद्द देखील करता येईल, असं DGCA ने म्हटलं आहे. मात्र, याची माहिती प्रवाशांना द्यावी लागणार आहे.
Directorate General of Civil Aviation (DGCA) issued SOPs stating that airlines may cancel, sufficiently in advance, flights that are expected to be delayed beyond 3 hours.
"In view of the prevalent fog season and adverse weather conditions, airlines may cancel, sufficiently in… https://t.co/Oxxh0Cq9c7
— ANI (@ANI) January 15, 2024
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जारी केलेल्या या सुचना तात्काळ लागू कराव्यात असं देखील बजावण्यात आलंय. त्यामुळे आता प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. फ्लाइटला सहा तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, डीजीसीएने विमान कंपनीला प्रवाशाला सुटण्याच्या वेळेच्या 24 तास आधी अलर्ट करणे अनिवार्य आहे.