Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद

छत्तीसगडचे डीजीपी अवस्थी यांनी यासंदर्भात माहिती दिली.   

Updated: Apr 3, 2021, 09:11 PM IST
Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद  title=

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित बिजापूर जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले आहेत. तर 10 जवान गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. चकमकीत काही नक्षलवाद्यांचा देखील खात्मा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्तीसगडचे डीजीपी अवस्थी यांनी यासंदर्भात माहिती दिली. याबद्दल अवस्थी यांनी तात्काळ बैठक देखीव बोलावली आहे

शहीद झालेल्या जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. बिजापूर जिल्ह्यातील तर्रेम भागात भारतीय जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. तर  घटनास्थळी नक्षवाद्यांचे देखीव मृतदेह आढळून आले आहेत. नक्षवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांची चोख प्रत्युत्तर दिलं. 

जखमी जवानांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमी जवानांना एअरफोर्सच्या हेलिकॉप्टर आणि रूग्णवाहिकेने उपचारासाठी रूग्णालयात पाठवले आहे.