पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

सीमेवर पाकिस्तानकडून खोड्या काढणं सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राजौरी आणि पूँछ इथं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. 

Updated: Jun 1, 2017, 09:50 PM IST
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर title=

श्रीनगर : सीमेवर पाकिस्तानकडून खोड्या काढणं सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राजौरी आणि पूँछ इथं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. 

भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार झाले, तर 6 जवान जखमी झालेत. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात ग्रेफचा एक नागरी कामगार ठार झाला तर बीएसएफच्या एका जवानासह दोघं जण जखमी झालेत. 

राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये साडेसात वाजता आणि पूँछ जिल्ह्यात कृष्णागती सेक्टरमध्ये 7 वाजून 40 मिनिटांनी पाकिस्तानच्या बाजूनं हल्ले सुरू झाले. या दोन्ही ठिकाणी भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.