भारतीय नौदलात ‘कलवारी’ पाणबुडीचा समावेश, जाणून घ्या वैशिष्ट्ये

भारतीय नौदलाला मोठ्या प्रतिक्षेनंतर जगातली सर्वात घातक स्कॉर्पीन पाणबुडी आयएनएस कलवारी (INS Kalvari) नौदलाच्या ताफ्यात शामिल करण्यात आली आहे.

Updated: Sep 22, 2017, 12:25 PM IST
भारतीय नौदलात ‘कलवारी’ पाणबुडीचा समावेश, जाणून घ्या वैशिष्ट्ये title=

नवी दिल्ली : भारतीय नौदलाला मोठ्या प्रतिक्षेनंतर जगातली सर्वात घातक स्कॉर्पीन पाणबुडी आयएनएस कलवारी (INS Kalvari) नौदलाच्या ताफ्यात शामिल करण्यात आली आहे.

ही पाणबुडी नौदलात तैनात करण्यात आल्यानंतर आता भारताची समुद्रातील ताकद अधिक वाढली आहे. भारतीय नौदलाकडे ही पाणबुडी माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ने सोपवली आहे. 

भारतीय नौदलात अशा आणखी ५ पाणबुड्या सामिल करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यातील ‘खंडेरी’ आणि ‘करंज’ या दोन पाणबुड्यांची टेस्ट सध्या सुरू आहे. नौदलाच्या एका अधिका-यांनी सांगितले की, ही बाब भारतीय नौदलाच्या पाणबुडी प्रोजेक्टसाठी मैलाचा दगड आहे. कारण यामुळे भारताची समुद्रातील शक्ती आणखी वाढणार आहे.  

एमडीएलच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, ‘पहिली स्कॉर्पीन पाणबुडी कलवारी भारतीय नौदलाला सोपवल्यानंतर एमडीएलने इतिहास रचला आहे’. या पाणबुडीला फ्रान्सच्या नौदल सुरक्षा आणि ऊर्जा कंपनी डीसीएनएसने डिझाईन केलं आहे. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट-७५ नुसार याचं निर्माण मुंबईच्या एमडीएलच्या माध्यमातून केलं जात आहे. 

काय आहेत स्कॉर्पीन पाणबुडी आयएनएस कलवारीची वैशिष्ट्ये?

- अरबी समुद्रात टेस्टींग दरम्यान ‘कलवारी’तून अ‍ॅंटीशिप मिसाईलने समुद्राच्या खोलातील सर्वच टारगेटला हिट केलं होतं. या मिसाईलमध्ये समुद्रातील दुश्मनांच्या वॉरशिप संपवण्याची क्षमता आहे. 

- कलवारी हे नाव एकप्रकारच्या शार्क माशावरून घेतले आहे. या माशाला टायगर शार्क म्हणतात.

- कलवारी डिझल आणि इलेक्ट्रिक सबमरीन आहे. 

- ‘कलवारी’ तील गायडेड शस्त्रास्त्र दुश्मनांच्या चिंधड्या उडवू शकतात. 

- ‘कलवारी’ टॉरपीडो हल्ल्यांसोबतच पाण्याच्या आतही हल्ले करता येऊ शकतात. त्यासोबतच पाण्यातून जमिनीवरही यातून हल्ला केला जाऊ शकतो. 

- या पाणबुडीचं डिझाईन असं करण्यात आलंय की, ही पाणबुडी कोणत्याही प्रकारच्या युद्धात ऑपरेट केली जाऊ शकते. 

- दुस-या नेव्हल टास्क फोर्ससोबत सहजतेने संवाद साधण्यासाठी यात खास कम्युनिकेशन मिडीयम देण्यात आलं आहे. 

- ही पाणबुडी प्रत्येक प्रकारचे वॉरफेअर, अ‍ॅंटी-सबरमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजंसला एकत्र करण्याचं काम उत्तम करू शकते. 

- ‘कलवारी’ मध्ये वेपन्स लॉन्चिंग ट्यूब्स देण्यात आले आहेत. यामुळे समुद्रात यावर शस्त्रास्त्र लोड केले जाऊ शकतात आणि कोणत्याही क्षणी हल्ला केला जाऊ शकतो. 

- ही नवीन स्कॉर्पीन पाणबुडी जुन्या पाणबुड्यांची जागा घेणार आहे. भारताकडील सिंधुघोष आणि शिशुकुमार पाणबुड्या आता ३० वर्ष जुन्या झाल्या आहेत. चीनची वाढती ताकद पाहता भारत आता आपल्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी धडपड करत आहे.