जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

या कारवाईत सीआरपीएफचे दोन जवान तर एक पोलीस जखमी झालाय

Updated: May 5, 2018, 09:12 PM IST
जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान title=

जम्मू : जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून मोठी कारवाई सुरु आहे. श्रीनगरच्या चट्टबल इथं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. सकाळच्या सुमारास या परिसरात दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारानंतर भारतीय जवान आणि पोलिसांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला. यावेळी सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलंय. 

तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलाच्या हाती लागलेत. या कारवाईत सीआरपीएफचे दोन जवान तर एक पोलीस जखमी झालाय. दरम्यान हे ऑपरेशन संपल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आलीय.