हैदराबाद : प्रसिद्ध अभिनेत्री माधवी लताने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशअध्यक्ष लक्ष्मण, वरिष्ठ नेता बंडारू दत्तात्रेय यांच्या उपस्थितीत माधवीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माधवी लताने म्हटलं की, ती पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल. काही दिवसांपूर्वीच माधवी लता हिने पवन कल्याण यांचा राजकीय पक्ष जनसेनेचा प्रचारप करणार असल्याचं म्हटलं होतं.
जनसेनाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्याकडून श्रीरेड्डी यांच्या वक्तव्या विरोधात माधवी लताने फिल्म चेंबर्समध्ये आंदोलन केलं होतं. माधवी लता जनसेनामध्ये प्रवेश करेल अशी चर्चा होती पण आज तिने भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. माधवी लताचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षात स्वागत केलं. तेलंगनामध्ये पक्ष वाढत असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.