सामाजिक न्याय मंत्रालयाच्या कार्यालयात आग; अग्निशमन दलाच्या २८ गाड्या दाखल

पंडित दीनदयाल उपाध्याय अंतोदय भवनच्या पाचव्या मजल्यावर आग.

Updated: Mar 6, 2019, 11:12 AM IST
सामाजिक न्याय मंत्रालयाच्या कार्यालयात आग; अग्निशमन दलाच्या २८ गाड्या दाखल title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सीजीओ कॉम्पलेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सीजीओ कॉम्पलेक्समधील पंडित दीनदयाल उपाध्याय अंतोदय भवनच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या २८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या इमारतीत आग लागली आहे ती इमारत ११ मजली असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आग सर्वात आधी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या कार्यालयात लागली. त्यानंतर आग संपूर्ण मजल्यावर पसरली. मदत आणि बचावकार्यासाठी मोठ्या उंचीच्या क्रेनचा वापर केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भीषण आगीत केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाचे  (सीआयएसएफ) जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळी जवळपास ८.३० वाजता आग लागली होती. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल दाखल झाले असून पोलिसांकडून आग लागलेला आसपासचा परिसर खाली करण्यात आला आहे.